पुणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षे वयाचे होते .व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते 1996 पासून कार्यरत होते .सविता चारुदत्त गोखले यांच्या ; पुणे दर्शन नावाच्या भारतातील पहिल्या खाजगी व्हिडीओ न्यूज बुलेटीन ला त्यांची व्यंगचित्रे प्रदर्शित करण्याचे काम तत्कालीन पुणे दर्शन चे संपादक आणि मुख्य वार्ताहर लोणकर बंधू यांनी केले होते . तेव्हा पासून पुण्याच्या वाहतूक विषयावर ते वेळोवेळी रस्त्यावर उतरत आले . . ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. त्यांचा हा शिरस्ता सुरूच होता
अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’
त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार