जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

Date:

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलेल्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच रंगभूमीवरील त्यांच्या योगदानासाठी 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘बालिका वधु’ मालिकेत ‘दादी सा’ ही त्यांची भूमीकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘किस्सा कुर्सी का’ या नाटकातून त्यांनी 1978 मध्ये रंगभूमीवर पदार्पण केले होते.जवळपास 20 वर्ष रंगभूमीवर काम केल्यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मालिका व चित्रपटात भूमिका साकारल्या. आयुषमान खुराना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची दादी ची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांच्या जाण्याने चित्रपट व टीव्ही मालिका क्षेत्रातून हलहळ व्यक्त होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...