शहर आणि राज्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी सूचना पाठवा-आमदार शिरोळे यांचे आवाहन

Date:

पुणे : राज्य आणि शहर याच्या सूक्ष्म नियोजनासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींनी सूचना पाठवाव्यात असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले असून, या सर्व सूचना राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आमदार शिरोळे यांनी ट्विट करून हे आवाहन केले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुण्याभोवतीच्या टेकड्यांचे रक्षण, शहरातील कचरा समस्या, नदी प्रदूषण, आरोग्य यंत्रणा याबाबत लोकांनी सुचविलेल्या अनेक सूचना मागील सरकारकडे मांडल्या होत्या. परंतु, त्या सरकारने या सूचनांकडे गांभीर्याने बघितले नाही. आता राज्यात सत्तांतर झाले आहे. नवे मुख्य मंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोघेही विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करणारे आहेत. त्यांच्यापर्यंत या सूचना पोहोचविल्या तर ते सूचनांवर योग्य ती अंमलबजावणी करतील, असा विश्वास वाटतो. याकरीता विविध संस्था, व्यक्ती यांच्याकडून शहर विषयक आणि राज्याच्या धोरण विषयक सूचना मागविल्या आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. अनेकांनी सोशल मीडियावरून या आवाहनाला भरघोस प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

हे आवाहन करतानाच डेक्कन जिमखाना परिसर समितीशी संवाद साधून त्यांच्याही काही कल्पनांविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. इंद्रनील चितळे यांच्यासह काही उद्योजकांशीही चर्चा केलेली आहे. पुण्याचे औद्योगिकीकरण, अर्थकारण यावरची त्यांची डॉक्युमेंट्स यावरही विचारविनिमय चालू आहे, हे सर्व एकत्रितपणे मुख्य मंत्री आणि उपमुख्य मंत्री यांच्यासमोर मांडले जाईल त्यातून शहर आणि राज्याच्या सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने हातभार लावला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...