पुणे- ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ३० विद्यार्थ्यांची लॉकडाऊनच्या काळातहि कॅम्पस प्लेसमेंटद्वारे भारत फोर्ज या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड करण्यात आली.
भारत फोर्ज हि अंतरराष्ट्रीय स्तरावर मेकॅनिकल क्षेत्रात कार्यरत असलेली भारतातील नामांकित कंपनी आहे. सातत्याने शिक्षणाचा ध्यास आणि आधुनिक तंत्राचे दैनंदिन प्रशिक्षण हि भारत फोर्ज ची कार्यप्रणाली आहे. औद्योगिक क्षेत्राशी पूरक शैक्षणिक उपक्रम निर्माण करून राबविण्याचे कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चालू आहे. अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टूडट ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत नोकरीकरीता आवश्यक असलेले प्रशिक्षण सातत्याने दिले जाते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये जापनीज भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरु होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.गणेश कोंढाळकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. दिगंबर पवार, समन्वयक, प्रा.चेतन कोळंबे यांचे मार्गदर्शन लाभले. लॉकडाऊनच्या काळात देखील विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

