पुणे-विद्यार्थ्यांना नोकरीची संधी शिक्षण घेत असतानाच मिळावी या उद्देशाने अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल या नामांकित कंपनीमध्ये निवड करण्यात आली. या कंपनीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून निवड प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची निवड केली. अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल हि अंतरराष्ट्रीय स्तरावर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (MSW) व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेली भारतातील नामांकित कंपनी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील हर्ष शहा, प्रवीण कावळे, श्रीपाद अलुलकर या विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक चार लाखाचे पॅकेज मिळाले. औद्योगिक क्षेत्राशी पूरक शैक्षणिक उपक्रम निर्माण करून राबविण्याचे कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे चालू आहे.



निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.गणेश कोंढाळकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. दिगंबर पवार, समन्वयक, प्रा.चेतन कोळंबे यांचे मार्गदर्शन लाभले. डिग्रीपूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

