दसऱ्यानिमित्त १३ किलो वजनाच्या सोन्याच्या साडीतील पहा महालक्ष्मी (व्हिडीओ)
पुणे-–
येथील सारसबागेसमोरील महालक्ष्मी ला आज गुरुवारी दुपारी ४ वाजता १३ किलो वजनाची सोन्याची साडी परिधान करण्यात आली .भाविकांनी या सोन्याच्या साडीतील देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती .देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ८ वे वर्ष होय. दरवर्षी विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग , नवरात्रोत्सवातर्फे परंपरा आहे . अंदाजे १३ किलो वजनाची हि साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्ब्ल १ वर्षे मेहनत करून हि साडी तयार केली आहे . या कारागिरांनी पुण्यात मंदिरात १ वर्षे मुक्काम करून अहोरात्र कष्ट करून हि साडी तयार केली . हि सोन्याची साडी खास विजयादशमीच्या दिवशी देवीला परिधान केली जाते .
सुवर्ण वस्त्राने परिधान देवीचे हे आगळे वेगळे रूप भाविकांना उद्या विजयादशमीच्या दिवशी रात्री पर्यंत अनुभवता येणार आहे