पुणे- हड़पसर येथील पूनावाला या हॉस्पिटलमध्ये पुणे महानगरपालिकेकडून Front Line Worker लोकांकरिता covid १९ च्या दुसऱ्या टप्प्यामधील लसीकरणाला महापालिका अतिरिक्त आयुुुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

या वेळी Front Line Worker म्हणून रुबल अग्रवाल यांनी covid १९ ची लस घेतली.या वेळी त्यांनी सर्व पुणेकरांना आवाहन केले की , नागरिकांनी covid १९ ची लस घ्यावी , ही लस अत्यंत सुरक्षित आहे .नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती या लसीकरणा बाबतची बाळगू नये. जेव्हा तुम्हाला ही लस घेण्याकरिता फोन किंवा sms येईल तेव्हा ही लस नक्की घ्या असे त्यांनी सांगितले . Covid १९ लसीकरण मोहीम Front Line Worker यांचे करिता पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ आणि राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा येथे सोमवार पासून सुरू करण्यात आलेली आहे. या वेळी डॉक्टर अमित शहा सहायक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका, डॉक्टर किरण शहा उपस्थित होते .

