राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा महाराष्ट्रभर व्हाव्यात- नाना पटोले

Date:

पुणे- राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा महाराष्ट्रातच काय देशात व्हायला पाहिजेत यातून चांगले नागरिक घडतील व राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल.असे उद्गार येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.

माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांची जयंती व राजीव गांधी इ लर्निंग स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज राजीव गांधी इ लर्निंग स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, उल्हास पवार, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर,अमीर शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्व. राजीव गांधी यांच्या अर्ध पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महानगरपालिकेच्या शाळेत सामन्यांची मुले शिक्षण घेतात, राजीव गांधी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी विचार केला की,देशातील सर्व राज्यांमध्ये महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सामान्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची चांगली व्यवस्था केलीच पाहिजे, आबा बागुल यांनी 10 वर्षापूर्वी ई लर्निंग स्कूल सुरू करून तिला राजीव गांधींचे नाव दिले व त्यामध्ये सामान्यांच्या व गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. असा अभिनव प्रयत्न त्यांनी केला त्यांचे कौतुक आहे. एका शास्त्रज्ञाने चांगले सांगितले आहे. देवाने सर्वांना बुद्धी सारखीच दिली आहे. परंतु कोणी त्याचा वापर कसा करतो यावर सगळे अवलंबून असते. त्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे आबा बागूल यांनी पुढाकार घेऊन ही शाळा सुरू केली हे महत्वाचे आहे. अश्या शाळा महाराष्ट्रातच काय देशात व्हायला पाहिजेत यातून चांगले नागरिक घडतील व राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल.
आबा बागुल म्हणाले की, भारतीय संगणक युगाचे निर्माते राजीव गांधी यांच्या दुरदृष्टीतून प्रेरणा घेऊन 10 वर्षांपूर्वी राजीव गांधी इ लर्निंग स्कूल सुरू केली त्याची दशकपूर्ती होताना अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहे. आयआयटी,इंजिनिर,डॉक्टर होत आहेत. तसेच नासा सारख्या जगप्रसिद्ध संस्थेत काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे. यातून राजीव गांधी यांचे शिक्षणाची गंगा तळागाळातील मुलांना मिळत आहे त्यातूनच राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा अभिमान आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रथिनिक स्वरूपात करण्यात आला त्यामध्ये नंदन खाटपे, प्राची जगदाळे,प्रणव जागडे, प्रियांका ढमढेरे,जयदत्त सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर विलासराव देशमुख तारांगणाला नाना पटोले यांनी  सदिच्छा भेट देऊन विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तारांगणातील शो पाहून त्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बागुल यांनी केले आभार सागर आरोळे यांनी मानले याप्रसंगी नंदकुमार बानगुडे , अभिषेक बागुल, द स पोळेकर,  इम्तियाज तांबोळी , धनंजय कांबळे, महेश ढवळे ,तेजस बागुल, विकास मनोरे, विजय सकट, बाबालाल पोळके, ओंकार उपाध्ये, सुरज सोनवणे, उमाकांत गायकवाड,विश्वास दिघे, गौरव साळवे, तुषार पवार, ऋषिकेश मोडवे, राहुल तौर, सौरभ ढेबे, इत्यादी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...