‘बालशिक्षण’मध्ये ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा!

Date:

शताब्दी वर्षानिमित्त स्नेहमेळावा, रक्तदान शिबीर व जुने कपडे संकलन उपक्रम
पुणे : सकाळी घंटानाद… प्रार्थना… वर्गखोल्या, आवारात केलेला दंगा… वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केलेले विविध गुणदर्शन… मित्रांशी गप्पा मारत खाल्लेला डबा… आवडत्या बाईंकडून गिरवलेले धडे… ३५-४० वर्षानंतर सगळे काही अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
निमित्त होते, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या १९८१-९० या दशकातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे! शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून, रविवारी स्नेहमेळावा, रक्तदान शिबीर आणि जुन्या कपड्यांचे संकलन करण्यात आले. विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली व आठवणींना उजाळा दिला.
प्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, शिशु विभागाच्या रोहिणी फाळके यांच्यासह माजी विद्यार्थी मावळचे प्रांत संदेश शिर्के, प्रसिद्ध डॉ. वीरेंद्र घैसास, डॉ. श्रीधर चिपळूणकर, निवृत्त कर्नल अमित कासोदेकर, बोईंग इंडियाचे उपाध्यक्ष अंकुर कनंगलेकर, तेजा दिवाण आदी उपस्थित होते.
निवृत्त शिक्षिका सुनीता पत्की, अंजनी गोसावी, सरिता भाटवडेकर, वासंती औटी, अनुराधा शेंबेकर, अंजनी वारकर, अश्विनी भिडे, कमल फरांदे यांचा विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या यशाने या शिक्षिका देखील भारावून गेल्या.
शताब्दी वर्षातील स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने १०० माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबीर आणि जुन्या कंपड्यांचे संकलन करण्यात आले. हे कपडे गुडविल इंडिया फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांना देण्यात येणार आहेत. जीर्ण कपड्यांच्या गोधड्या व सतरंज्या बनवून त्या रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड व रस्त्याकडेला राहणाऱ्या गरजूना वितरित करणार असल्याचे आनंदी पाटील यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...