पुणे-शेफलर इंडियाने प्रो कबड्डी लीग संघ पुणेरी पलटण सोबत प्रायोजकत्व करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारासह कंपनी सीझन ९ साठी संघाची सहयोगी प्रायोजक बनली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीने या संघासोबत करार केला आहे. या प्रायोजकत्वाअंतर्गत, शेफलर विविध व्यासपीठांवर पुणेरी पलटण संघासाठी “पॉवर्ड बाय” भागीदार म्हणून दिसेल आणि कंपनीचा लोगो संघाच्या अधिकृत जर्सीच्या मागील बाजूस दिसेल.

या सहयोगाबाबत बोलताना शेफलर इंडियाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष (इंडस्ट्रीयल बिझनेस) श्री. हर्षा कदम म्हणाले, ‘’पुणेरी पलटन संघासोबत सलग दुसऱ्या वर्षी आमचा हा सहयोग आहे. अनेक आव्हानांना न जुमानता या संघाने अथक चपळतेसह गेल्या हंगामात त्यांची क्षमता दाखवून दिली आहे, जे शेफलरशी देखील संलग्न आहे. पुणेरी पलटण संघामध्ये तरुण व अनुभवी टॅलेण्ट्सचे उत्तम संतुलन आहे आणि या संघाचे अनेक चाहते आहेत. आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही आणखी एका उत्साहवर्धक सीझनची वाट पाहत आहोत.”
शेफलर इंडियाच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटचे अध्यक्ष श्री. देबाशिष सतपती म्हणाले, “आम्हाला प्रो कबड्डी लीगच्या ९व्या सीझनसाठी पुणेरी पलटन संघाला पाठिंबा देण्याचा आनंद होत आहे. मागील सीझनमध्ये आमच्या भागीदारीमुळे आम्ही आमच्या लक्ष्यित प्रेक्षकांसह उच्च ब्रॅण्ड प्रतिसाद पाहिला आणि यावर्षी तो आणखी वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. या सीझनमध्ये प्रेक्षक प्रत्यक्ष स्टेडियममध्ये खेळ पाहण्याचा आनंद घेण्यासाठी येणार असल्यामुळे आम्हाला मागील सीझनच्या तुलनेत अधिक उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.’’
पुणेरी पलटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कैलाश कांडपाल म्हणाले, “मला शेफलरने पुणेरी पलटनसोबत पुन्हा सहयोग केल्याचा आनंद होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रगण्य कंपनी स्वदेशी खेळावर विश्वास दाखवते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, खेळाडूंवर उच्च दर्जाची कामगिरी करण्याची आणि खेळाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची अतिरिक्त जबाबदारी वाढते. प्रेक्षकांच्या रेटिंग्जमधून प्रो कबड्डी लीग ही भारतातील दुसरी सर्वाधिक पाहिली जाणारी लीग असल्याचे दिसून येते. मला विश्वास आहे की, पुणेरी पलटन संघ शेफलरला देशभरातील ग्राहकांशी संलग्न होण्यास मदत करेल आणि ब्रॅण्डला या सहयोगाला फायदा होईल.’’
सणासुदीचा काळ सुरू असताना चाहत्यांसाठी अनेक सहभागात्मक उपक्रम, डिजिटल मोहिमा व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, जेथे ब्रॅण्ड विविध उत्पादनांचे प्रमोशन करेल आणि ऑन-ग्राऊण्ड उपक्रम व डिलर टच पॉइण्ट्सच्या माध्यमातून हा सहयोग पुढे घेऊन जाईल. पुणेरी पलटन व शेफलर इंडियाचा या सहयोगाचा लाभ घेण्याचा आणि चाहते, ग्राहक, कर्मचारी व डिलर्सना गुंतवून ठेवण्यासोबत त्यांचे मनोरंजन करत नवीन उंची गाठण्याचा मनसुबा आहे.
पुणेरी पलटनने यंदा पीकेएल २०२२ ऑक्शनदरम्यान अनेक सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये स्टार खेळाडू फजल अत्राचली, मोहम्मद इस्माइल नाबिबाख्श आणि इतर सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामुळे संघाची ताकद निश्चितच वाढली आहे. प्रो कबड्डी लीग २०२२ साठी संघामध्ये एकूण १८ खेळाडू आहेत.

