एसबीआय लाइफ इन्शुरन्सने मिळविला २५,४५७ कोटींचा नवीन व्यवसाय प्रीमियम 

Date:

देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षाच्या २०,६२४ कोटीच्या तुलनेत ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी २५,४५७ कोटींचा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदवला आहे. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या संबंधित वर्षाच्या तुलनेत नियमित प्रीमियम मध्ये २५% वाढ झाली आहे.

संरक्षणावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून एसबीआय लाइफचे संरक्षण २४%ची वाढ होऊन नवीन व्यवसाय प्रीमियम ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षात ३,०५२ कोटी होते. वैयक्तिक संरक्षण नवीन व्यवसाय प्रीमियमने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षात २६%ची वाढ नोंदवली आणि ती ९३८ कोटी झाली. वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम (Individual New Business Premium) ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या याच वर्षाच्या तुलनेत ३२% वाढीसह १६,५०० कोटींवर पोहोचला.

एसबीआय लाइफचा करानंतरचा नफा ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षात १,५०६ कोटी इतका आहे.

३१ मार्च २०२२ रोजी कंपनीचे पतदारी गुणोत्तर १.५० या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत २.०५  वर मजबूत राहिले.

एसबीआय लाइफचे एयूएम देखील ७१:२९ या डेब्ट इक्विटी मिक्स सह ३१ मार्च २०२१ रोजी असलेल्या २,२०,८७१ कोटीपासून ३१ मार्च २०२२ रोजी २१% दराने वाढून २,६७,४०९ कोटींपर्यंत वाढले आहे. ९६%हून जास्त डेब्ट गुंतवणुका एएए आणि सार्वभौम साधनांमध्ये आहे.

कंपनीकडे २,०५,७१७ प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क आहे आणि देशभरात ९५२ कार्यालयांसह व्यापक स्थान आहे. त्यामध्ये मजबूत बँकाशुरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर, मायक्रो एजंट, कॉमन सर्व्हिस सेंटर, विमा मार्केटिंग फर्म, वेब एग्रीगेटर आणि थेट व्यवसाय यांचा समावेश आहे.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षातील कामगिरी

·         व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस (VONB) मध्ये ३९% वाढ ¹होऊन ३,७०४कोटी.

·         VONB मार्जिन २७० बिपिएसने सुधारून २५.९% वर

. • एम्बेडेड मूल्यावर ऑपरेटिंग रिटर्न २०.६%

·         २३.४% समभागासह १२,८७२ कोटींच्या वैयक्तिक रेटेड प्रीमियम (IRP) मध्ये खाजगी बाजारपेठीय नेतृत्व

. • वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये ३२%ने वाढ होऊन ते १६,५०० कोटींवर.

·         प्रोटेक्शन नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये २४%वाढ होऊन ते ३,०५२ कोटींवर

·         वैयक्तिक नवीन व्यवसाय सम अॅश्युअर्डमध्ये १६%वाढ

·         १३ व्या महिन्याचे पर्सीस्टन्सी गुणोत्तर ८५.१८% वर

·         व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (AuM) २१% वाढून २,६७,४०९ कोटींवर

·          २.०५च्या मजबूत सॉल्व्हेंसी रेशोसह प्रति शेअरवर २.० अंतरिम लाभांश

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...