पुणे :पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर २९३ वी जयंती महोत्सवाची सुरुवात काल दुपारी १ वाजता शनिवार वाडा ते सारसबाग भव्य ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. या मध्ये प्रामुख्याने पारंपरिक वाद्य ढोल पथक ,हलगी ,मैदानी खेळ,धनगर लोकप्रिय नृत्य ,तसेच घोड्यावर पारंपरिक वेषेत महिला होत्या ,रथ या मध्ये सहभागी होते. पारंपारिक वेशभूषेत हजारो धनगर बांधव या मध्ये सहभागी झाले होते.
हि मिरवणूक दशनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चौक ,फडगेट पोलीस स्टेशनमार्गे स्वारगेट पासून सारसबाग येथे मिरवणुकीसाची सांगता झाली.
सारसबाग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अभिवादन सभा व पुरस्कार सोहळा घेण्यात आला. ह्या वर्षीचे समाज भूषण पुरस्काराचे ३ मानकरी आहेत १}आमदार दत्ता भरणे {इंदापूर} २}विश्वास देवकाते {पुणे जि .प. अध्यक्ष },३}आमदार नारायण आबा पाटील {जेऊर , करमाळा }
या कार्यक्रमाचे उदघाटक मंत्री विजय शिवतारे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड अण्णा पाटील ,प्रमुख प्रवक्ते मिथुन आटोळे ,आमदार योगेश टिळेकर ,गोपीचंद पडळकर ,आमदार दत्ता भरणे ,पुणे जि .प .अध्यक्ष विश्वासराव देवकाते,तुकाराम करे ,नगरसेवक उदय डांगे,शशिकला वाघमारे ,मोहन शेंडगे व या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के उपस्थित होते.
धाडसी प्रराक्रमी व प्रशासनावर प्राधान्य निर्माण करण्याऱ्या पहिला महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ना घावे लागेल असे प्रतिपादन मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी केले.
आमचे प्रेरणा स्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत त्यांनी समाजामध्ये योग्य मार्ग दाखवला स्त्रियांनी एकत्र येऊन संघटित व्हावे व राजमातेचे विचार आत्मसात करावेत असे मत ह्या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के यांनी व्यक्त केले यावेळी हजारोंचा समुदाय सारसबाग येथे उपस्थित होता.