‘रात गयी, बात गयी…’ म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर बोलणे टाळले

Date:

पुणे-भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, कालच्या आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेवर आज नाशिक मध्ये खडसे यांनी ,’ भाजपमध्ये आलेल्या सर्वांना चॉकलेट बिस्किटे चं दिली वाटते ..असा उलट टोला दिला आहे . मात्र यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणे टाळले आहे. ‘रात गयी, बात गयी…’ असे म्हणत त्यांनी खडसेंविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या ‘अटल’ बस सेवेचा आज त्यांनी शुभारंभ केला. या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले,आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत पीएमपीएमएलने पुणे शहरातील गर्दीच्या व अरूंद 9 मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 97 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. तसेच डेपो अंतर्गत टर्मिनल एकुण 53 मार्गावर 143 बसेसचे संचलनाचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना 5 रू. दरात 5 कि.मी. अंतराचा सुखकर प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी दर 5 मिनीटांनी बसेस उपलब्ध असतील.

रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. याने वेळ आणि पैशांची बचत होणार असेल, तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील असा मला विश्वास आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...