पुणे- स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा कोण कोणत्या भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती मोठ्ठ्या आहेत याचा खुलासा भारत सरकारने करावा अशी मागणी पुण्यातून आज झाली आणि अन्य पुरस्कारांच्या साठी होणाऱ्या वाशिलेबाजीच्या गोष्टी करणाऱ्या नितीन गडकरी यांनी याबाबत आपले धोरण स्पष्ट करावे असेही मत मांडण्यात आले .मुलींसाठी शाळा सुरु केली म्हणून सावित्रीबाई यांना दगडे मारण्यात आली त्यांच्यावर टीका करण्यात आली आता त्यांच्याच मुली शिक्षणाने समृध्द झाल्या . भारतीय स्त्री ने शिक्षण घेवून आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी घेतली . होत्या सावित्रीबाई म्हणून भारतीय स्त्रियांनी गगन भरारी घेतली . त्याहून क्रिकेट खेळणारे , आणि अभिनय करणारे मोठ्ठे आहेत काय? असाही सवाल आज करण्यात आला
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सारसबागेसमोरील पुतळ्यासमोर अभिवादन सभा घेण्यात आली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. या वेळी एम. डी. शेवाळे आणि लतिका साठे यांनी पुतळ्यास अभिवादन के
शैक्षणिक कार्याबद्दल जनजागृती, विद्यार्थिनींनी क्रांतिज्योतींच्या वेशभूषेत काढलेली अभिवादन फेरी, आदर्श शिक्षिकांचा सत्कार, “क्रांती‘शिल्पाचे अनावरण आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध संस्था, संघटनांनी शहरातील विविध ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना रविवारी अभिवादन करून त्यांची जयंती साजरी केली.
रिपब्लिकन जन-शक्तीतर्फे अभिवादन फेरी काढून फुलेवाडा येथे सभा घेण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र मोरे, संगीता सरोदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे गौतम डोळस, संजय भिमाले यांनी, तर साध्वी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने शारदा लडकत यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
महात्मा फुले समता परिषद वानवडीतर्फे अध्यक्ष शिवराम जांभूळकर यांनी, तर माळी आवाजतर्फे अध्यक्ष विजयकुमार लडकत यांनी फुले यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. रिपब्लिकन संघर्ष दलातर्फे संजय भिमाले यांनी क्रांतिज्योतींना पुष्पहार अर्पण करून, शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याची मागणी केली.
गरजूंना बिस्किटांचे वाटप करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे उपाध्यक्ष आनंद सोनवणे यांनी अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागातर्फे शिक्षिका विनिता गवळी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फुले यांना अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीने ऍड. अभय छाजेड आणि अंजली निम्हण यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योतींना अभिवादन केले. या वेळी तुकाराम पाटील यांचे “साध्वी सावित्रीबाई‘ या विषयावर व्याख्यान झाले. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे डॉ. उज्ज्वला हाके यांच्या हस्ते फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे शहरतर्फे हिराबाग येथील पक्षकार्यालयात सावित्रीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. शफी शेख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, औदुंबर खुने-पाटील उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीतर्फे दांडेकर पूल ते स्वारगेट दरम्यान अभिवादन फेरी काढली. या वेळी ऍड. वैशाली चांदणे, उमेश चव्हाण, मीनाक्षी माने आणि संध्या चौरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच, फुलेवाडा येथे शिल्पकार आर. डी. यांनी बनविलेल्या “क्रांती‘शिल्पाचे अनावरण महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवदास महाजन यांच्या हस्ते झाले.