क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त हिराबाग येथील पक्ष कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस स्विकृत नगरसेवक अभिजित बारावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, नितीन जाधव, विनायक चाचर, आनंद रिठे, योगेश वराडे, संजय गाडे, शंकर शिंदे, सुरेश पवार, कमलाकर गुंजाळ, अविनाश वेल्हाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.