पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त ८० फूट लांबीची आणि ६० फूट रुंदीची रांगोळी काढण्यात आली होती. राष्ट्रीय कला अकादमी आणि इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरांचे व्यक्तिचित्र, समुद्रात उडी घेणारा ऐतिहासिक प्रसंग, अंदमानच्या तुरुंगात कोलु फिरवणे, कारागृहाच्या भिंतीवरील काव्यलेखन, भगवती देवीसमोरील प्रतिमा हे प्रसंग आणि सावरकरांच्या विविध ६३ पैलूंची ओळख रांगोळीतून करून देण्यात आली. अकादमीच्या ९० रांगोळीकारांनी दहा तासात ही रांगोळी साकारली. विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन सावरकरांना आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदेवतेचे समुहगीत आणि सावरकरांवरील व्या‘याने सादर केली. शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग‘ाम, पर्यवेक्षक सुनील शिवले, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, प्रा. सु. ह. जोशी, अकादमीचे अमर लांडे, प्रतिक आठणे यांची प्रमुख उपस्थिती होती.