पुणे-सावरकरांचे विचार कालातीत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर असायला पाहिजे, दुसर्या देशांवर अवलंबून राहाणे योग्य नाही हा सावरकरांचा विचार रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आजही महत्त्वाचा ठरत असल्याचे मत माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंडारे यांनी व्यक्त केले.
मी सावरकर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉटसअप वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खंडारे बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. अभिनेता योगश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.तरुणांनी सावरकरांचे विचार आचरणात आणावेत आणि त्यावर संशोनध होणे आवश्यक असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सावरकरांचे विचारांचा प्रसार करण्याची गरज असल्याचे मत सोमण यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीच्या कश्ती शेख या विद्यार्थिनीला स्पर्धेची महाविजेती म्हणून निवड करण्यात आली. मी सावरकर टीमचे रणजीत नातू यांनी सूत्रसंचालन, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टचे धनंजय बर्वे यांनी प्रास्ताविक आणि अमेय कुंटे यांनी आभार मानले.स्वागत मी सावरकर टीम रणजीत नातू, प्रास्ताविक धनंजय बर्वे अध्यक्ष स्वानंद चॅरिटेलबल ट्रस्ट, अमेय कुंटे आभार मानले

