न्यु कोपरे गावातील वंचित कुटूंबांच्या पुनर्वसनासाठी ५ जुलै रोजी युक्रांदचे सत्याग्रही आंदोलन

Date:

वंचितांच्या हक्काच्या घरासाठी युक्रांदचा सत्याग्रह
पुणे :न्यु कोपरे गावच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या कुटूंबांना न्याय मिळावा, या मागणीसाठी  ५ जुलै रोजी युवक क्रांती दलाच्या वतीने कर्वेनगर ( आंबेडकर चौक )येथील काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या साईटसमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. ‘ हक्काच्या घरांसाठी सत्याग्रह ‘ असे या आंदोलनाचे नाव आहे.
युवक क्रांती दलाच्या वतीने पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
  संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, सचिन पांडूळे, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले,यल्लाप्पा धोत्रे, नंदू शेळके, ललित मुथा, कुमार गायकवाड आणि   पुनर्वसनापासून वंचित नागरीक आंदोलनात सहभागी होणार आहेत.
          न्यु कोपरे गावातील ८८ वंचित कुटूंबांचे पुनर्वसन २००१ सालापासून झालेले नाही. २०१६ साली ह्या वंचित कुटूंबांनी युवक क्रांती दलाकडे यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यावेळी विकसक संजय काकडे यांनी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांना भेटून पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. काकडे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. अखेर १७ एप्रिल २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत युवक क्रांती दलाने रस्त्यावर उतरून सत्याग्रही आंदोलने केली. ६ एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस डॉ. सप्तर्षी, युक्रांदचे पदाधिकारी आणि विकसक सुर्यकांत काकडे ( संजय काकडे यांचे बंधू )  हजर होते. या बैठकीत काकडे यांनी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८८ वंचित कुटूंबांची पुरावे असलेली कागदपत्रे युवक क्रांती दलाने सादर केली. या कागदपत्रांची छाननी करून जानेवारी २०२० मध्ये जिल्हाधिकारी नवल किशोर  राम यांनी वंचित कुटूंबांचा अधिकार मान्य केला आणि विकसक काकडे यांना नोटीस बजावली. जानेवारी २०२० पासून आजपर्यंत वंचित कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू झालेली नाही. या अन्यायाबदद्ल विकसक काकडे यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. वंचित ८८ कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू करावी, अशी या आंदोलनाची मागणी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...