वचनपूर्तीचे समाधान सर्वात महत्वाचे -खासदार गिरीश बापट (व्हिडीओ)

Date:

पुणे दिनांक 25 फेब्रुवारी : नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या विकास निधीतून बावधन येथील अमर जवान चौकामध्ये भारतीय सैन्य दलाशी निगडीत स्मारक व अमर जवान वाचनालयाचे  उद्घाटन तसेच अटल योजनेंतर्गत कोथरूड डेपो ते बावधन ते कोथरूड डेपो या वर्तुळ मार्गावर दोन अटल बससेवेचा शुभारंभ  खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडला. 

 या कार्यक्रमाप्रसंगी खासदार गिरीश बापट म्हणाले की, भारतीय सैन्य दलाबाबत मनामध्ये असणारे प्रेम नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी उभारलेल्या स्मारकातून जनतेसमोर  व्यक्त केले आहे. 5 रूपया मध्ये 5 किलोमीटर अटल बस सेवेच्या संकल्पनेतून नागरिकांच्या हितासाठी दोन बससेवा वेडेपाटील यांच्या माध्यमातून बावधनकरांसाठी आज पासून सुरू करण्यात आल्या आहेत.  निवडून येण्यापूर्वी आपण जनतेला दिलेल्या वचनपूर्तीचे समाधान सर्वात महत्वाचे असते .वेडेपाटील आणि भाजपा चे नगरसेवकांनी त्याची कास धरली आहे याचे मला कौतुक आणि आनंद आहे.

बावधन परिसरातील नागरिकांसाठी चालू करण्यात आलेल्या अटल बस क्र. के – 21 मार्ग (कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – लक्ष्मी दत्त चौक – टोयोटा शोरूम – बाळतुका कोर्नर – चेलाराम हॉस्पिटल – सूर्यदत्ता कॉलेज – डीएसके रानवारा – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो) के – 21 (ए) मार्ग (कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – टिन्सेल टाउन – विज्ञांननगर चौक – सिद्धिविनायक चौक – बँक ऑफ महाराष्ट्र – डी पॅलेस – बावधन पोलिस चौकी – रामनगर कॉलनी –  बावधन पोलिस चौकी – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो)

सदर कार्यक्रमाप्रसंगी भा.ज.पा पुणे शहर सहकार आघाडीचे अध्यक्ष सचिन दांगट नगरसेवक किरण दगडे, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका डों. श्रद्धा प्रभूणे-पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, भाजपा क्र. 10 चे अध्यक्ष सागर कडू, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडी चे अध्यक्ष धनंजय दगडे, सहकार्यालयीन मंत्री राजेश कुलकर्णी, भाजपा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष मंदार घुले,  राजेश मनगिरे, राजाभाऊ जोरी, अजित शिवगण, रूपेश भोसले, रुगाराम चौधरी, केसरम चौधरी, ह.भ.प. शंकर वेडे, ह.भ.प.कान्हू वेडे, ह.भ.प. अरुण वेडे, ह.भ.प. बंडू माताळे, सुरेश गुरव, सुभाष वाघमारे, बाळासाहेब कुडापणे, दिलीप पुराणिक, कल्याणी कलावंत, निधी भाटीया, ऊज्वला पाटील, विजय करंजावणे, तसेच बावधन ज्येष्ठ नागरिक संघ व बावधन हास्य क्लबचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे व विजय करंजावणे यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...