Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सर्व लाईन व्यस्त आहेत’ची स्टारकास्ट जास्त पण प्रत्येकाची भूमिका इंटरेस्टिंग

Date:

अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा कॉमेडी, वेगळ्या प्रकारची ऍक्शन, इमोशनने परिपूर्ण सिनेमा १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची पत्रकार परिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या सिनेमातील कलाकार सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल उपस्थित होते. सिनेमाशी संबंधित पत्रकारांनी टीमशी भरपूर गप्पा मारल्या, त्यांचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून शेअर करण्यात आला.

सिध्दार्थ जाधव यामध्ये बाब्या हे पात्रं साकारत आहे जो समीर म्हणजेच सौरभ गोखलेचा मित्र दाखवला आहे. “बाब्या हा असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे असतंच. प्रेक्षकांना मी विनोदी सिनेमांतून आवडतो हे त्यांच्याकडून मिळणा-या प्रेमामुळे दिसून आलंय. सिनेमा सुंदर झालाय, प्रेक्षकांना हसवेल. यामधील गाणी पण छान आहेत”, असं सिध्दार्थने म्हटले.

“विनोदी भूमिका मी यापूर्वी कधी केली नव्हती म्हणून जेव्हा या सिनेमासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी सिनेमाला होकार दिला. पहिले मला शंका होती की मला जमेल की नाही, पण करुन पाहावं असा विचार केला आणि टीमही छान होती. विशेष म्हणजे, त्यात सिध्दार्थ हा मित्राची भूमिका साकारतोय असं कळलं तेव्हा मी अजून कम्फर्टेबल झालो. सिध्दार्थकडून शिकायलाही मिळालं.”

राणी अग्रवालने म्हटलं की, “माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण मला मराठीसोबत गुजराथी भाषा पण शिकावी लागली. संपूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला, सांभाळून घेतलं.” तर संस्कृती म्हणते, “सौरभसोबत यापूर्वी काम केलं होतं म्हणून तेव्हा थोडीशी रिलॅक्स झाले जेव्हा कळलं की कास्टमध्ये मित्र सौरभही आहे. कॉमेडी भूमिका कधी केली नव्हती आणि त्यामुळे जमेल की नाही अशी थोडीशी भिती वाटत होती. मी यामध्ये एका फोटोग्राफरचा रोल साकारतेय. त्यामुळे कॅमेरा हँडल करायला, शिकायला मिळत होता.”

सिनेमात इतकी स्टारकास्ट होती की मी नेमकी कुठे प्लेस होईल, याबाबतीत मी थोडी गोंधळली होती. पण जेव्हा मला संपूर्ण गोष्ट ऐकवण्यात आली तेव्हा मी सिनेमाला होकार दिला. विनोदाचा किंग सिध्दार्थसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक होते, असे नीथा शेट्टी-साळवी हिने म्हटले.  मी यामध्ये अर्पिताची भूमिका साकारतेय, ही हॅप्पी-गो-लकी मुलगी आहे. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह आहे. आपण आनंदी, पॉझिटिव्ह राहायला हवं, टेन्शनला बाजूला ठेवायला हवं असं सांगणारी अशी अर्पिता आहे, असे स्मिता शेवाळे हिने म्हटले.

हेमांगी कवीने तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले की, “माझ्या भूमिकेचं नाव यामध्ये प्रियंका आहे. प्रियंका म्हटंलं की प्रेमळ, प्रिया असं लगेच डोक्यात येतं पण मी या उलट आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माझ्या डोक्यावर एक कापड आहे आणि माझे हात-पाय बांधले आहेत त्यामुळे मला माझ्या डोळ्यातून एक्सप्रेशन्स द्यायचे होते, हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण असं का हे तुम्हांला सिनेमा पाहिल्यावर कळेलच.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...