सारसबाग पुन्हा बंद

Date:

पुणे-करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने सारसबाग पुन्हा बंद करण्याचा निर्णय महापालिके च्या उद्यान विभागाने घेतला. तसेच शहरातील सुरू करण्यात आलेल्या अन्य उद्यानांमध्येही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तीही उद्याने बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.उद्यानांमध्ये येणारे अनेक नागरिक मुखपट्टीचा वापर करत नाहीत. करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दटावणाऱ्या रखवालदारासोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही सारसबागेत घडले. या सर्व पार्श्वभूमीवर१४ नोव्हेंबर पासून सारसबाग बंद करण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती. शहरात लहान-मोठी अशी २०४ उद्याने आहेत. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याबाबत नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. राज्यातील अन्य मोठय़ा शहरांमधील उद्याने अद्यापही बंद आहेत. मात्र, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ८१ उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली केली होती. मात्र, उद्याने सुरू करताना दहा वर्षांखालील मुले आणि ६५ पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार या व्यक्तींना प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. हास्य क्लब, योग, दिवाळी पहाट कार्यक्रम, यांना  बंदी घालण्यात आली होती. तसेच उद्यानात येणाऱ्यांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...