अखिल मंडई मंडळ : गणेशोत्सवाचे १२९ वे वर्ष
पुणे : अखिल मंडई मंडळाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक ‘अमोघ त्रिशक्ती नाग’रथातून निघणार आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने अमोघ त्रिशक्ती नागरथ साकारण्यात आला आहे. या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रथावर ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती साकारण्यात येणार आहे. नागाच्या वेटोळ्यामध्ये शारदा गजाननाची मूर्ती विराजमान होणार आहे. विशाल ताजनेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले आहे.
२२ फूट लांब व १४ फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची ३२ फूट असणार आहे. शेषनाग हा १९ फुटांपर्यंत राहणार असून, त्यामागे ११ फुटी त्रिमूर्ती असणार आहेत. हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे ३० फुटांचा रथ ११ फुटांनी कमी होऊन १९ फूट होऊन रथ मेट्रोच्या पूलाखालून सहजरीत्या पार होईल.
या रथावर विविध लाईट्स लावण्यात येणार आहेत. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचा सनई चौघडा त्यामागे गंधर्व बँड असणार आहे. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील.
‘अमोघ त्रिशक्ती नाग’ रथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक
Date: