मुंबई –
बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली – २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२१) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत रुपये २० हजार इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
दीपावली -२०२१ करीता महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घोषित करण्यात आला.
क्रम | तपशिल | सानुग्रह अनुदान रक्कम |
१ | महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचारी, प्राथमिक शिक्षक | रु. २०,०००/- |
२ | माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी | रु. १०,०००/- |
३ | प्राथमिक शिक्षण सेवक | रु. ५,६००/- |
४ | आरोग्य सेविका | रु. ५,३००/- |
५ | विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक | रु. २,८००/- |
बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.