पुणे-भीमा कोरेगाव ला झालेली दंगल ,तिथे अपुरे पडलेले प्रशासन याची नैतिक जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापटांवर आहे. पण ते आहेत कुठे ? असा सवाल संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आज केला . बंद शांततेत पार पाडला .पण आमची मागणी कायम आहे. तातडीने एकबोटे आणि भिडे यांना अटक करावी अन्यथा त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, जमत नसेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही शिंदे यांनी म्हटले आहे ..पहा आणि ऐका आज नेमके शिंदे यांनी काय म्हटले आहे …..