मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…!

Date:

सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे.

पुणे-संभाजी ब्रिगेड ची भूमिका मांडली संतोष शिंदे यांनी..त्यांच्याच शब्दात वाचा जशी च्या तशी…

सगळे ‘देव’ सध्या ‘लाॕकडाऊन’ आहेत. कारण प्रत्येक धर्म आणि धार्मिक स्थळे (मंदिर) हे माणसांवर अवलंबून आहे. त्यांचा पैसा ‘मंदिर, मज्जित आथवा चर्च’ यांच्या तिजोरीत जातो. जर माणसं जिवंत राहिली तरच मंदिर मज्जित, चर्च किंवा गुरूव्दार यांना किंमत येईल… अन्यथा या कोरोना’च्या महामारीमुळे सर्व बेचिराख होईल. कदाचित मंदिरांवर जगणाऱ्याच्या पोटात पोटसूळ उठेल. मात्र सरकारने माणसं जिवंत ठेवली पाहिजेत. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून संकटाच्या काळात राज्यासह देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीय करण करून तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा..हीच संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत मागणी राहिलेली आहेत.

सरकारने आज इतिहासाची प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही शत्रूला हात लावू दिला नव्हता. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा शेतसारा माफ केला होता. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. स्वराज्यात प्रत्येकाचा संरक्षण महाराजांनी केलं होतं. ‘छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी केली होती.’ आर्थिकदृष्ट्या गरीब दीन दलित व बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांची ओळख होती. बहुजनांच्या मुलांची शैक्षणिक कुवत वाढावी व सर्वांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व मंदिरांचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. हीच आजच्या काळाची गरज आहे. *माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब उशिरा बोलले मात्र खरं बोलले.’* आम्ही संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून गेली १५-२० वर्षापासून सतत पत्रव्यवहार करून सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मा. अॕड. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यापासून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला किंवा संकटाच्या काळात (अधिवेशन असो किंवा आंदोलन अथवा जयंती) वेळोवेळी मागणी करत आलेला आहे.

सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टची नोंदी सरकारकडेच झालेली आहे. सर्व धार्मिक स्थळे व ट्रस्ट ‘धर्मदाय आयुक्तांच्या’ अंतर्गत येतात. महाराष्ट्र सरकारने राज्यात KG to PG पर्यंतचे शिक्षण दर्जेदार सर्वांना सक्तीचे व मोफत करून सर्वांसाठी खुले करावे आणि सर्वांनी राज्यातील सर्वांच्या आरोग्यासाठी ‘सर्व धार्मिक स्थळांचा पैसा सरकारने समाजहितासाठी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वापरलाच पाहिजे… अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

सर्व मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…! सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. तो पैसा राज्य सरकारने जनहितासाठी वापरला पाहिजे.

– संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...