पुणे-नव्या पेशवाई विरोधात येत्या ३१ डिसेंबर रोजी असंख्य संघटनांच्या वतीने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पुणे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेतून संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, तसेच ज्योती जगताप ,अंजुम इनामदार आदी कार्यकर्त्यांनी दिली .
1 जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावच्या जाती अंत लढ्याला २०० वर्षे पूर्ण होत आहेत .या निमित्ताने १६ जिल्ह्यातील संघटनांनी भीमा कोरेगाव शोर्य दिन प्रेरणा अभियान या आघाडीची स्थापना करून संविधान वाचवा , लोकशाही वाचवा ,देश वाचवा हि भूमिका घेत फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकते या परिषदेत सहभागी होत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली .
गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी ,तसेच उमर खालीद,भिम आर्मीचे विनय रतन सिंग,,प्रशांत डोंथा ,तसेच सुधी रढवळे, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर,माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील,सर्व्हर जनांदोलनाचे उल्काताई महाजन ,आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी,ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डाच्या राष्ट्रीय सचिव मौलाना अजहरी आदी मान्यवर शनवार वाड्यावरील या एल्गार परिषदेत सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
उद्घाटन सत्राला नव्या पेशवाई विरोधातला सांस्कृतिक एल्गार असे नाव देण्यात आले असून या मध्ये भीमा कोरेगाव लढ्याची गाणी आणि नव्या पेशवाईच्या अंताची गाणी होतील . शहीद रोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला या सत्राचे उद्घाटन करतील तर अभियानाची भूमिका डॉ. संग्राम मौर्य विषद करतील. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन सत्र होईल .
त्यानंतर पहिल्या सत्राला नव्या पेशवाई विरोधात उभरत्या प्रतिकाराचा एल्गार असे नाव देण्यात आले आहे याबाबतची भूमिका राहुल वाघ विषद करतील ,सूत्रसंचालन सागर गोरखे करतील . आ.जिग्नेश मेवाणी,भगतसिंग आंबेडकर स्टुडंट ऑर्ग. चे उमर खालीद ,भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि युपी तील विनय रतनसिंग आणि हैद्राबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असो . चे प्रशांत दोन्था यांची भाषणे होतील .
दुसऱ्या सत्राला भीमा कोरेगाव ने दिलाय धडा ,नवी पेशवाई मसणात गाडा असे नाव देण्यात आले असून सुधीर ढवळे यामागची भूमिका विषद करतील सूत्र संचालन वीरा साथीदार करतील .भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर ,माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील,तसेच उल्का महाजन , सोनी सोरी, मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांची या सत्रात भाषणे होतील .असे या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले .