पुणे-लेखक दिग्दर्शक संतोष रामदास राऊत, यांनी एका तासात १२९ फेटे बांधण्याचा ग्रीनीज वॅल्ड रेकॉर्ड साठी मंगळवार दि. २४ मे २०१६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.येथे नवा विक्रम पूर्ण केला.यावेळी मराठी चित्रपट महामंडळा चे मेघराज राजेभोसले,संजय ठुबे ,निकिता मोघे मनसे चित्रपट सेनेचे कुणाल निंबाळकर,मयूर जोशी,शार्दुल लिहिणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच श्री.ज्ञानेश्वर मोळक (पुणे महानगर पालिका उपायुक्त), .डॉ.अजय दुधाने (समाजसेवक ) डॉ.मदन कोठुळे (अद्वैत कला व क्रीडा मंच) तसेच शैलेश यादव व संजय पवार हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.
राऊत यावेळी म्हणाले कि , १० टक्के लोकांना सुद्धा आज फेटा बांधता येत नाही हि खंत वाटते .. हि आपली परंपरा अगदी सोपी आहे. प्रत्येकाला फेटा बांधता येऊ शकेल. वीस सेकंदात जर मी एक फेटा बांधू शकत असेल तर आपणही एका मिनिटांत फेटा बांधू शकता. हाच विचार माझ्या मनात आला व मी आता एका तासात जास्त फेटे बांधण्याचा प्रयत्न केला.हि आपली कला सर्वाना यावी या साठी छोटासा प्रयत्न केला आजच्या विक्रमाचे सर्व फोटो व व्हिडीओ ग्रीनीज वॅल्ड रेकॉर्ड साठी पाठविणार आहे.असे ते म्हणाले … या विक्रमानंतर काय म्हणाले ते पहा आणि ऐका …




