सदगुरू माताजी जी च्या उपस्थिती मध्ये निरंकारी समागम
पुणे:- संत निरंकारी मंडळाच्या वतीने सासवड येथे भव्य निरंकारी आध्यत्मिक समारोहाचे आयोजन करण्यात आले असून 1 लाखाहून अधिक भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.ह्या सोहळ्या विषयी अधिक माहिती देताना पुणे जिल्ह्याचे झोनल प्रमुख ताराचंद कारांचंदानी यांनी सांगितले की, नुकताच मुंबई मध्ये महाराष्ट्राचा 50 व निरंकारी संत समागम पार पडला.सासवड येथे 1 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत जगताप ग्राउंड,हाडको रोड,पाण्याच्या टाकीजवळ, सासवड,ता. पुरंदर, जिल्हा पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमात पुणे जिल्हा तसेच सातारा,सांगली,कराड,नगर,कोल्हा पूर येथून सुमारे 1 लाखाहून अधिक भाविक सत्संगाचा लाभ घेणार आहेत.या कार्यक्रमा मध्ये सदगुरू माता सविंन्दर हरदेव जी महाराज यांच्या अमृत प्रवचनाचा लाभ होणार आहे.या सत्संग सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.