पुणे – केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प पाहिला तर सर्वसामान्यांशी , आणि मध्यमवर्गीयांशी नाळ तुटलेला हा अर्थसंकल्प आहे असे म्हणावे लागेल केंद्रातील मोदी सरकारचा अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे निराशाजनक आहे. यामध्ये नोकरदार, मध्यमवर्गीय, पेन्शनर, शेतकरी, गरिब यांच्या प्रमाणेच लघु व मध्यम उद्योगांना कोणताही दिलासा दिलेला नाही.देशातील वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी यावर मार्ग काढण्यासाठी कोणतीही उपाय योजना नाही.अशी टीका पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
ते म्हणाले,’शिक्षण व आरोग्य या महत्वाच्या क्षेत्रांनाही महत्व दिले नाही. कोरोनाग्रस्त देशाला व सर्वसामान्य जनतेला आता मोठा दिलासा मिळणे गरजेचे होते. अंदाज पत्रकात देशाच्या भावी वाटचालीचे प्रतिबिंब पडणे आवश्यक असते. त्या दृष्टीने हे अंदाज पत्रक शंभर टक्के नापास झाले आहे. सर्वसामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या मोदी सरकारच्या निष्क्रियतेचे प्रतिबिंब या अंदाज पत्रकात पडले आहे. उद्योगपती धार्जिणे धोरण स्वीकारल्या मुळे देशाची ही परिस्थिती झाली आहे. आगामी आर्थिक वर्ष जनतेचा दृष्टीने अधिक हालअपेष्टाचे होणार हा संदेश मोदी सरकारने या अंदाज पत्रकातून दिला आहे अशी प्रतिक्रीया या पत्रकाद्वारे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे.

