पुणे : (अनिल चौधरी)
ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते “संजीवनी संस्थेच्या” कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. बाबासाहेबांना ख़ास पूणेरी पगड़ी,शाही शाल व् पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आदरणीय बाबासाहेबांचे मौल्यवान मार्गदर्शनही सर्वांना लाभले.
शिवाजी महाराजांची गोष्ट सांगून त्यांनी इतिहासातील आठवणींना उजाळा करून दिला आणि त्यातून प्रत्येकाने आपापले काम व् जबाबदारी योग्यरित्या चोख पार पाडावी हा गुरुमंत्र देखील त्यांनी यावेळी सर्वाना दिला. त्यांच्या ख़ास शैलीत-मोडी लिपित अहवालावर स्वाक्षरी करून शुभाशीर्वाद दिला.
यावेळी संजीवनीच्या संस्थापिका अध्यक्षा सौ विशाखा गायकवाड़ व् कार्याध्यक्ष श्री संदिप गायकवाड़ यांच्याशी आजवरच्या कार्यात आलेले अनुभव,गंमती-जमती,समस्या व् लोकांचा प्रतिसाद याविषयी बाबांनी आस्थेने चौकशी केली. हनुमान जयंतीच्या दिवशी या कार्यअहवालाचे औपचारिकरित्या प्रकाशन पार पडले.
यावेळी बोलताना बाबासाहेब म्हणाले “स्वराज्याला समोर ठेऊन सद्ध्या संस्थांचे व् संघटनांची कामे करण्यावर भर देण्यात यावा यातून संघटनेला नवी ओळख व् यश प्राप्त होईल..!!”
यावेळी संस्थेच्या संस्थापिका सौ विशाखा गायकवाड़, कार्याध्यक्ष श्री संदिप गायकवाड़,श्री नंदकुमार घनवट, श्री ज्ञानेश जाधव,सौ पौर्णिमा लुणावत,सौ वैशाली आल्हाट, सौ सुमित्रा जाधव,सौ विजया खड़के,सौ रेखा घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
३महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज योग मिळाला व् बाबांचे आशिर्वाद मिळाल्याने संस्थेच्या अध्यक्षा विशाखाताई गायकवाड तसेच इतर सदस्यांचा आनंद गगनात मावत नव्हता