अहिल्यादेवी हेच नांव बरोबर! वा. ना. उत्पातांनी समाजाची माफी मागावी- सोनवणी

Date:

पुणे- अहिल्या की अहल्या हा वाद केवळ विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव दिल्याबद्दल पोटशूळ उठलेल्या मंडळींचे
प्रतिनिधी श्री. वा. ना. उत्पात यांनी निर्माण केला आहे. यामुळे जनसामान्यांत संभ्रम पसरला असून नामविस्तारामुळे झालेल्या
आनंदावर विरजन पडले आहे. वैदिक धर्माचे अभिमानी लोक प्रत्येक शब्दाचे कृत्रीम संस्कृतीकरण करत तेच शब्द मुळचे आहेत
असा दावा आजवर करत आले आहेत. अगदी सालाहनचे शालिवाहन, सूग या मुळच्या शब्दाचे शृंग असली असंख्य मुळ प्राकृत
शब्दांची पोरकट संस्कृत रुपांतरे केल्याने इतिहासाची अक्षम्य हानी झालेली आहे. ‘अहिल्या’हे नांव चुकीचे असून ‘अहल्या’ हे
नांव असले पाहिजे असे श्री. वा. ना. उत्पातांचे मतही याच प्रकारात मोडते. त्यांनी दिलेली अहल्या या शब्दाची व्युत्पत्तीही चुकीची
असून’अहेव लेणे ल्यालेली ती अहिल्या’ असा या जनमानसात रुळलेल्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अर्थ आहे. समाजात उगाचच
गोंधळ माजवून सामाजिक तेढ पसरवण्याचे काम केल्याबद्दल श्री. उत्पात यांनी जनतेची जाहीर लेखी माफी मागीतली पाहिजे
अशी मागणी आदिम हिंदू महासंघाचे अध्यक्ष व इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केली. महाराजा यशवंतराव होळकर गौरवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
वैदिक परंपरेतील संस्कृतकरण केलेल्या अहल्या या शब्दाचा अहिल्या या शब्दाशी व त्याच्या मूळ अर्थाशी काहीही संबंध
नाही. प्राकृत हीच मुळची भाषा असून संस्कृत भाषा ही इसवी सनाच्या दुस-या शतकात जन्माला आली. प्राकृतातील अगणित
शब्द या भाषेने ध्वनीबदल करुन स्विकारले, पण या उद्योगात अनेक शब्दांचा मुळ अर्थ व संदर्भ हरपला. ही इतिहासाची नासाडी
करणारी बाब होती. परंतू वैदिक धर्माभिमानी आपल्या वर्चस्ववादाच्या नादात सामान्य हिंदूत सातत्याने अपसमज पसरवत राहिले
आहेत आणि त्यामुळे सामाजिक हानी होत आहे असेही श्री. सोनवणी म्हणाले.
होळकर घराण्याबाबत वारंवार खोटे आक्षेप घेत प्रवाद पसरवले जातात. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव
देण्यासही होळकरांबद्दल असलेल्या असुयेपोटी विरोध केला जात होता. विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव दिले तर समाजात तेढ
माजेल असे वादग्रस्त विधानही शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी केले होते. आता विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर ज्यांचा
पोटशूळ उठला आहे ते आता अनैतिहासिक वायफळ वाद उकरुन काढत आहेत. यामुळे समाजात नाराजी पसरली असून धनगर समाजाची एक तरी मागणी मान्य झाली म्हणून झालेल्या आनंदावर विरजन घालण्याचा अक्षम्य प्रकार श्री. उत्पातांकडून घडला
आहे, असेही सोनवणी म्हणाले.अहिल्या हा शब्द पहिल्या शतकातील गाथा सप्तशतीतही आलेला आहे. संस्कृत भाषा तेंव्हा जन्मालाही आलेली नव्हती.शिवाय सुभेदार मल्हारराव होळकर ते स्वत: अहिल्यादेवी आपल्या पत्रांत अहिल्या असाच उल्लेख करत आले आहेत. नाना
फडवणीस ते दिल्लीचा बादशहाही त्यांच्या पत्रांत अहिल्याच म्हणतात. समकालीन शिलालेखांतही अहिल्या हेच नांव आलेले आहे.
जनमानसात अहिल्या हेच नांव लोकप्रिय व आदरणीय राहिले आहे. खुद्द अहिल्यादेवींनाच चूक ठरवू पाहण्याचा अश्लाघ्य प्रकार
श्री. उत्पात यांच्याकडून घडला आहे. प्राकृत भाषेतील शब्दांना मूळ न मानता नंतर आलेल्या संस्कृत भाषेत असलेले शब्द मूळ
मागणे हा वैदिक परंपरेचा डाव आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला दिले हे सहन न झाल्याने पोटशूळ
उठलेल्यांनी हा वाद निर्माण केला आहे. आदिम हिंदू महासंघ या प्रवृत्तीचा निषेध करतो व श्री. वा. ना. उत्पातांनी समस्त
समाजाची लेखी जाहीर माफी मागावी अशी मागणी करतो, अन्यथा त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशाराहीश्री. संजय सोनवणी यांनी केला. या प्रसंगी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश खाडेही उपस्थित
होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...