मुंबई – संजय दत्त ची शिक्षा आता संपत असून तो २५ फेब्रुवारीला सकाळी येरवडा कारागृहातून बाहेर पडेल असे सूत्रांचे म्हणणे आहे .
संजय दत्तचा शिक्षेचा कालावधी कधी संपतो आहे यावरून वेगवेगळ्या तारखांचा घोळ घातला जात असताना आता या तारखेचे कन्फर्मेशन दिले जाते आहे
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयनं आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती.आता चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला काही शिक्षा माफ करण्यात येत आहे कि काय ? अशा अनेक प्रश्नांची अधिकृत उत्तरे येणे बाकी आहे .