सृष्टिज्ञान मासिकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

Date:

पुणे-गेली ९२ वर्षे अखंड पणे मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराचे कार्य करणार्‍या सृष्टिज्ञान मासिकाच्या ११०१ व्या अंकाचा प्रकाशन समारंभ व त्यानिमित्त आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक लेखन’ स्पेर्धेचा बक्षीस समारंभ दिनांक फर्ग्युसन महाविद्यालयात साजरा झाला.
कार्यक‘माचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. रविन्द्र सिंह पदरेशी होते, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे व सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रानिक सायन्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अरविन्द शाळीग्राम हे प्रमुख पाहुणे होते.
या प्रसंगी मासिकाचे संपादक श्री राजीव विळेकर यांनी पाहूण्यांचे स्वागत केले, कार्यकारी संपादिका सौ. कविता भालेराव यांनी सृष्टिज्ञान मासिकाविषयी माहीती दिली.
ङ्गर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तर्ङ्गे या कार्यक‘माचे आयोजन केले गेले. विद्यार्थी श्रिया महाडिक व हृषिकेष खेडकर यांनी सूत्र संचालन केले तर साक्षी कोलगे हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक‘माच्या आयोजनात प्रा. आनंद काटिकर, प्रा. जयंत खेडकर व रा.से. योजना कार्यक‘म अधिकारी प्रा. शिवाजी कोकाटे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजविण्याची इच्छाशक्ति अन त्यासाठी प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. संस्थेच्या शाळांमधून या दृष्टीने चालू असलेल्या विविध प्रकारच्या उपक‘मांची त्यांनी माहिती दिली. या दृष्टीने सृष्टिज्ञान मासिक करीत असलेल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याचे विशेष कौतुक त्यांनी केले. डॉ. शाळीग्राम यांनी अनेक उदाहरणांच्याद्वारे छोट्या गोष्टीतून वैज्ञानिक दृष्टिीकोन समाजाच्या विविध घटकामध्ये कसा रुजविता येतो हे प्रभाविपणे विषद केले, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी याविषयी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्राचार्य डॉ. रविन्द्रसिंह परदेशी यांनी महाविद्यालयाचे अत्यंत कर्तृत्ववान, प्रभावी संशोधक अन् मार्गदर्शक व माजी विद्यार्थी या शब्दात वर्णन करून डॉ. शाळीग्राम यांचा सत्कार केला.
या प्रसंगी मधुमक्षिका पालन क्षेत्रातील वैज्ञानिक डॉ. क. क. तथा नाना क्षीरसागर यांना त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय मधुबन पुरस्कारासाठी डॉ. कुंटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वैज्ञानिक लेखन स्पर्धेत पुणे शहर परिसर या व्यतिरिक्त बार्शी, नाशिक, कराड इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक‘म समन्वयक प्रा. जयंत खेडकर यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली.
विविध स्पर्धेतील एकुण २३ स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली, त्यातील काही पुढील प्रमाणे
वैज्ञानिक किस्से व विनोद
प्रा डॉ. सुनील विभुते -प्रथम क‘मांक
कु. प्रतीक्षा पाटील – द्वितीय क‘मांक

वैज्ञानिक कथा
आदित्य जवळकर – प्रथम क‘मांक
डॉ. शुभंकर कुलकर्णी व महादेव शंकर पवार – द्वितीय क‘मांक
प्रा डॉ. सुनील विभुते – तृतीय क‘मांक

वैज्ञानिक शब्द कोडी
अद्वैत सोवळे – प्रथम क‘मांक
डॉ. नंदा हरम, सौ. माधुरी बनसोड – द्वितीय क‘मांक

याव्यतिरिक्त वैज्ञानिक व्यंगचित्र, रेखाचित्र, वैज्ञानिक लेख आदि विषयांशी संबंधी बक्षिसे देण्यात आली. नशिक येथील पूजा कोठावदे, पुणे येथील सुनंदा उमर्जी, श्रीमती कोकिला ढाके, मृणाल पाटसकर, आकुडी येथील सरसवती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्योति सोनावणे, प्रकाश सोनावणे, प्रथमेश काळे, कामिनी थोरात, अभिनंदन गायकवाड, नितिन लोखंडे यांचा प्रतिसाद कौतुकास्पद होता.
कार्यक‘म अधिकारी प्रा. शिवाजी कोकाटे, विज्ञान गट प्रमुख ओम भोमे व अन्य सहकारी विद्यार्थ्यांनी कार्यक‘म यशस्वितेसाठी खूप परिश्रम घेतले. कार्यक‘मास विद्यार्थी, प्राध्यापक, पालक इत्यादि बहु सं‘येने उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा

पुणे -पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची...

शीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरव

मूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णी स्वानंदी...

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १: राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय...