पुणे :
ढेपे वाड्याच्या वास्तुत मराठी संस्कृती जपणार्या विविध कला जोपासण्याच्या प्रमुख हेतूने पुर्वी वाड्यांच्या दिवाणखान्यांमध्ये होणार्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गाण्यांच्या बैठकींच्या संगीत मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीत बैठक मालेतील दुसरे पुष्प सानिया पाटणकर यांच्या सुरेल स्वरांचे असणार आहे. रविवार, दि.
५
मार्च
२०१७
रोजी सकाळी
१०.३०
वाजता हा कार्यक्रम ढेपेवाडा, गिरीवन, डोंगरगांव, ता.मुळशी येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ढेपे वाडा परिवाराचे नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी पत्रकाद्वारे दिली.
सानिया पाटणकर यांना तबल्यावर हेरंब जोगळेकर आणि हार्मोनियमवर दत्तराज सुर्लेकर साथ देणार आहेत.
या संगीत बैठक मालेतील पहीला कार्यक्रम पं. कैवल्य कुमारांचा यांचा झाला होता.
‘आजच्या आधुनिक पिढीला सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या आणि पेशवाईपर्यंत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलेल्या वास्तुशैलीची जवळून ओळख करून देण्याच्या उद्देशाने ’ढेपे वाडा’ वास्तु उभारण्यात आली. अस्सल मराठी मनाच्या कोपऱ्यात अनमोल म्हणून जपलेले सारे काही पुन्हा आधुनिक जगापुढे आणण्यासाठी अत्यंत अविरत प्रयत्नातून आम्ही आलिशान मराठा वास्तुशैलीचा आधुनिक आविष्कार जगापुढे घेऊन आलो आहोत. आपल्या वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श नव्याने अनुभवता यावा आणि नव्या पिढीला देखील ’वाडा’ संस्कृतीची ओळख व्हावी. या जाणिवेतून आम्ही ’ढेपे वाडा’ वास्तु साकारली आहे.
सानिया पाटणकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीतास सुरूवात केली. लीलाताई घारपुरे यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच ‘जयपूर अत्राऊली घराण्या’च्या डॉ. अश्विनी देशपांडे यांच्याकडे 14 वर्षे संगीताचे धडे घेतले. त्या दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील प्रख्यात कलाकार आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ’ऑल इंडिया रेडिओ’वरील शास्त्रीय संगीतात प्रथम श्रेणी मिळविली आहे. त्यांच्या संगीत बैठकी भारत आणि भारताबाहेर प्रचंड प्रतिसादात पार पडल्या आहेत.