पुणे : चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पातील संगमवाडी येथील पाण्याची नवीन टाकीचे काम येत्या दहा महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार ( एल अँड टी ) यांच्यासमवेत टाकीच्या बांधकामाचा आढावा आमदार शिरोळे यांनी नुकताच घेतला. टाकीचे बांधकाम सुरू असून दहा महिन्यात टाकी वापरासाठी . तयार होईल, अशी ग्वाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. काम पूर्ण होताच संगमवाडी च्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
या भेटीत आमदार शिरोळे यांच्यासमवेत नगरसेविका सोनाली खाडे, नगरसेवक आदित्य माळवे, भाजपचे शहर सचिव हरीष निकम, नाना गव्हाणे, आणि संतोष लांडगे सहभागी झाले होते.

