पुणे पोलिसांसाठी ४०० फेस शील्ड तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयासाठी २०० फेस शिल्ड प्रदान 

Date:

पु णे – पोलिस जीवाची बाजी लावून पुणेकरांसाठी लढत आहेत ,स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबीयांची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.अश्या परिस्थितीत त्यांची काळजी घेणे ही  आपली जबाबदारी असून याच भावनेतून कीट्रॉनिक्स चे राजेश कुलकर्णी आणि क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांची भेट घेउन ४०० फेस शिल्ड त्यांच्या सुपूर्द केले.तसेच या कठीण प्रसंगी पुणे पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.पुणेकर उत्तम सहकार्य करत असून सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना विरुद्धचे युद्ध नक्कीच जिंकू असे मत अशोक मोराळे यांनी  व्यक्त केले.त्यांनी स्वतः फेस शिल्ड चा वापर करुन पोलिस मास्क सह याचा ही वापर करतील असे आश्वस्त केले.तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या फील्ड वरील कर्मचाऱ्यांसाठी ही आज २०० फेस शिल्ड क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे यांना सुपूर्द करण्यात आले.

योग्य व्यक्तीं पर्यंत वस्तू पोहोचाव्यात  आणि खऱ्या गरजूंना मदत व्हावी यासाठी क्रिएटिव्ह फौंडेशन माध्यम म्हणून काम करत असून अनेक दानशूर अश्या स्वरूपात मदत करायला पुढे येत आहेत असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे  अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.या सर्व फेस शिल्ड उद्योजक श्री. नंदकुमार माने यांनी  स्पॉनसर केल्याचे राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...