मा कुणालकुमार,
आयुक्त,पुणे मनपा.
विषय – स्मार्ट पुणे ची मुहूर्तमेढ रोवणारे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या च्या दुरावस्थेबाबत….
मा महोदय,
आज श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची तिथीने पुण्यतिथी.यानिमित्त देवदेवेश्वर संस्थान ने त्यांच्या समाधी स्थळी कार्यक्रम आयोजित केला होता.(समाधीस्थळ पूना हॉस्पिटल समोर नदी पात्रात आहे )यावेळी मा उदयसिंह पेशवा,संस्थान चे विश्वस्त रमेश भागवत,सुधीर पंडित,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी समाधीस्थळाची पाहणी केली असता तेथील नानासाहेबांच्या कार्याची माहिती देणारे शिलालेख/म्युरल्स गायब असल्याचे निदर्शनास आले.समाधीच्या मागील बाजुस प्रचंड घाण व गटारीचे पाणी साचले असुन तेथील दुरावस्थेने मन विषण्ण झाले.
कालच पुण्यात स्मार्ट पुणे सिटी चा शुभारंभ करण्यात आला. आपणास कल्पना असेलच की आधुनिक पुण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात नानासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. १७४० ते १७६१ या त्यांच्या २० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी पुण्याला एका आधुनिक शहराचे रुप दिले. त्यांच्या कारकीर्दीत पुण्यनगरीस देशाच्या अघोषित राजधानी चे स्वरूप प्राप्त झाले.श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पुण्यास स्मार्ट सिटी चे रुप देताना अनेक पेठा वसवल्या,कात्रज येथे तलाव बांधुन पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खापरी नळाची योजना त्यांनी केली,शहरातील रमणबाग हीराबाग मोतीबाग सारसबाग यासह १३ बागा त्यांनी उभारल्या,अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केले ,व्यापाराला प्रोत्साहन दिले आणि इतिहासकारांच्या मते पुण्याचे गाव हे स्वरुप बदलुन त्यास शहराचे रुप दिले.
स्मार्ट पुणे ची बांधणी करताना शहराच्या स्मार्टनेस चे पहिले प्रणेते नानासाहेब यांच्या समाधी स्थळा सह शहरातील सर्व महनीय ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मरण स्थळांची जोपासना केली जावी व त्यांना स्मार्ट सिटीत अंतर्भूत करावे अशी आग्रही मागणी करत आहे.
नानासाहेब यांच्या समाधी स्थळास सीमाभिंत बांधुन संरक्षित करावे व त्यास कुलुपबंद दरवाजा करावा. देवदेवेश्वर संस्थान या स्थळाची निगा राखण्यास व येथे रखवालदार नेमण्यास तयार असल्याचे लेखी पत्र देउन ही प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे हे दुर्दैवी असुन हे स्थळ स्मार्ट करावे अशी मागणी करत आहे.
आपला
संदीप खर्डेकर
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन
मो ९८५०९९९९९५
९८२३०५२५९६
नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या च्या दुरावस्थेबाबत….संदीप खर्डेकर यांचे महापालिका आयुक्तांना पत्र (-पहा जसेच्या तसे )
Date:




