अलंकार पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असुन पूल मजबूत असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिल्याने डांबरीकरण – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे-एरंडवणा येथील अलंकार पोलिस स्टेशन ते गुळवणी महाराज पथ या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आज भूमीपूजन करण्यात आले.अलंकार पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक रेखा साळुंखे,पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे,राजबा ग तरुण मंडळ चे विठ्ठलराव बलकवडे,संदीप मराठे,शांताराम भरम,विजय केंडे,मंदार महाडिक,मोहन शिगवण,सतीश दिघे,देशप्रेमी मित्र मंडळ चे अध्यक्ष मंदार बलकवडे,समीर बलकवडे,रुपेश अटक,ॲड प्राची बगाटे,प्रमिलाताई फाले,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.नगरसेवक दीपक पोटे व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
” नागरिकांना अपेक्षित असणारे काम करण्यावर आमचा भर असुन नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश आमच्या बजेट मधे आम्ही केला असुन यापुढील काळात ही नागरिकांनी प्रभागातील विकास कामे सुचवावित /आम्ही ती कामे पूर्ण करु असे नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले.
साधारण ५० वर्षापूर्वी अलंकार सोसायटीने येथील नाल्यावर पूल बांधला होता,सदर पूल काळाच्या ओघात कमकुवत तर झाला नाही न अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मी पुणे मनपा प्रशासनास पत्र देउन या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली होती.प्रशासनाने हा पूल अद्याप उत्तम स्थितीत असुन त्यास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.प्रशासनाच्या निर्वाळ्यानंतर मी व सहकारी नगरसेवक दीपक पोटे यांनी येथे बजेट मंजुर करुन घेतले व त्यानुसार सदर रस्त्याचे डांबरीकरण होत आहे असे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी या रस्त्याचे काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व पुलाचे ऑडिट केल्याबद्दल ही आभार व्यक्त करुन आता पोलिस व नागरिक निर्धास्तपणे या पुलाचा व नवीन रस्त्याचा वापर करु शकतील असे सांगितले.
यावेळी नगरसेवक जयंत भावे व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी महेशराव पोटे,कुलदीप सावळेकर,माणिकताई दीक्षित,संगीता आदवडे,सुलभा जगताप,सुवर्णा काकडे,हनुमान पवार,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,चंद्रकांत पवार,प्रतीक ढावरे,सारंगशेठ राडकर,सुरेश जपे,सुरेश ढोबे,उपस्थित होते.
राज तांबोळी यांनी सूत्र संचालन केले.तर मंदार बलकवडे,मोहन मामा शिगवण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.