मनपा ने रेन वाटर हार्वेस्टिंग व कचरा विघटन प्रकल्पाची माहिती नागरिकांना देण्यासाठी कक्ष उभारावा-सौ मंजुश्री खर्डेकर
पुणे-सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने कमिन्स इंडिया व शाश्वत इको सोलयुशन फौंडेशन च्या सहकार्याने रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला ही बाब कौतुकास्पद असून अश्या प्रकारे कार्पोरेट सोशल रीस्पोनसिबलीटी सह सिटीझन सोशल रीस्पोन्सीब्लीटी ही महत्वाची आहे,आज एका चांगल्या प्रकल्पाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे.आज शालेय विध्यार्थ्यांना देखील रेन वाटर हार्वेस्टिंग शिकवले जात आहे.आता या सोसायटीला कधी टेनकर ची गरज पडणार नाही.महापालिके तर्फे ही मोठ्या प्रमाणावर रेन वाटर हार्वेस्टिंग चे प्रकल्प उभारले जात असून सहा कोटी लिटर पाणी याद्वारे साठविण्यात येईल.याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे. योकोहामा नावाच्या एका वाढत्या शहराने आपला तीस टक्के ३०% कचरा कमी करून दाखवला.हेय नागरिकांच्या इच्छा शक्ती मुळे शक्य झाले आहे. भारतामध्ये हे पुण्यात शक्य आहे.पुणेकर निश्चितच या दोन्ही क्षेत्रात यश मिळवतील,जलपुनर्भरण आणि कचरा कमी करणे व स्वतःचा कचरा स्वतःच जिरवणे हे नजीकच्या काळात पुण्यात शक्य आहे — असे प्रतिपादन मनपा आयुक्त कुणालकुमार यांनी केले .कर्वेनगर येथील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीतील सात ही इमारतींमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.
सुवर्णरत्न गार्डन सोसायटीच्या अध्यक्ष सौ मंजुश्री खर्डेकर या प्रास्ताविक करताना म्हणाल्या ” यावर्षी दुष्काळ पडला, पाणी टंचाई असल्याने व दिवसा आड पाणी येत असल्याने भविष्याची चाहूल लागली आणि आम्ही सर्व सात इमारतींमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग चे प्रकल्प उभारले.यापूर्वी देखील आपला कचरा आपण दुसर्याच्या दारात का टाकावा या भावनेतून आम्ही कचरा विघटन प्रकल्प उभारला व आमच्या सर्व २०० सदनिकाधारकांचा कचरा आम्ही आमच्या कडे जिरवण्याचा प्रकल्प उभारला.मात्र याबाबत आम्हाला अनेक ठिकाणी फिरून माहिती गोळा करावी लागली व शहरात सुरु असलेले प्रकल्प प्रत्यक्ष पाहून मग आम्ही हे प्रकल्प उभारले.मात्र पुणे महापालिकेने या दोन महत्वाच्या विषयावर कक्ष उघडले तर नागरिकांना असे प्रकल्प कसे उभारायचे याबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकेल व नागरिक मोठ्या प्रमाणावर असे प्रकल्प उभारण्यास पुढे येतील.यावर असा कक्ष आपण लवकरच सुरु करू असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले.
अन्य व्यस्त कार्यक्रमामुळे काहीश्या उशिरा पोहोचलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी रेन वाटर हार्वेस्टिंग व कचरा प्रकल्पाचे कौतुक करताना सुवर्णरत्न गार्डन सोसायटीचे सर्व नागरिक व अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी या दोन्ही प्रकल्पांद्वारे आपली सोसायटी आदर्श सोसायटी केली असून याचा आदर्श अन्य नागरिकांनी घ्यावा असे सांगतानाच अश्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच कोथरूड मतदारसंघात सर्वत्र असे प्रकल्प उभारण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सोसायटीच्या कचरा विघटन प्रकल्पावर काम करणाऱ्या व रोज सोसायटीचा ओळ सुका कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या राजू नडगिरी त्यांच्या पत्नी सौ अंबू तसेच ,कमिन्स इंडिया चे प्रमुख एस रवीचंद्रन व शाश्वत इको सोल्युशन्स च्या प्रज्ञा ठाकूर यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संदीप खर्डेकर,शिवराम मेंगडे,दिलीप उंबरकर,गणेश पासलकर,कल्पना पुरंदरे,अरुण साकळे,राज तांबोळी,मयूरआटाळे,रमेश चव्हाण,निलेश गारुडकर,अनुराधा एडके,जयेश सरनौबत,बागेश्री ठिपसे,अशोक प्रभुणे,विनायक काटकर,सतीश गायकवाड,पावित सहानी,व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक,रमेश राय यांनी स्वागत व आभार प्रदर्शन तर अशोक खांडेकर यांनी सूत्र संचालन केले.