ओला व सुका कचऱ्यासाठी डबे तसेच पतंजली च्या पेस्ट व साबणाचे वितरण संपन्न..
पुणे-
डी पी रस्त्यावरील ( म्हात्रे पूल ते राजाराम पूल रस्त्यावरील ) राजश्री शाहू वसाहतीचा स्वच्छतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले,या वसाहतीतील नागरीकांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या बकेट मध्ये संकलित करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी सर्व घरांसाठी बकेट वितरित केल्या.मनपा चे स्वच्छता कर्मचारी येवो न येवो आम्ही आमची वस्ती स्वच्छ ठेवतो हे वस्तीतील नागरिक राजेंद्र येडे व सुनील होलबेले यांनी सांगितले असता ” आपण ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर ही स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करणारे या वस्तीतील नागरिक अभिनंदनास पात्र असून,केवळ प्रशासनावर सगळी जबाबदारी सोपवून निर्धास्त न राहता या वस्तीतील नागरिक स्वतः झाडून काढतात हे स्तुत्य असल्याचे ही नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.या वस्तीतील नागरीकांनी मनपाच्या स्वच्छ वस्ती स्पर्धेत भाग घ्यावा असे ही त्या म्हणाल्या. या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने पतंजलीची दंत कांती टूथ पेस्ट आणि हळदी चंदन साबणाचे वाटप करण्यात आले,नागरीकांनी स्वदेशीच्या वापरावर भर द्यावा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी यावेळी केले.
यावेळी राजेंद्र येडे,सुनील होलबेले,अलकाताई गुळवे,अंजनाताई कदम,अजय काळे,अलकाताई येडे इ उपस्थित होते.