पुणे-सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोसावी वस्तीतील बचत गटातील महिलांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते साड्या भेट देउन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यात आली.धर्मसभा न्यासा च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की “दिवाळीच्या निमित्ताने आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच आनंद वाटण्याचे काम ही केले पाहिजे, समाजातील सर्व घटकांपर्यंत हा आनंद पोहोचला तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असे म्हणता येइल,आणि म्हणूनच धर्मसभेच्या माध्यमातून आज बचत गटातील महिलांना साडी भेट देताना मनस्वी आनंद होत आहे असे ही त्या म्हणाल्या.धर्मसभा न्यासाच्या वतीने बालसंस्कार वर्ग,गरीब मुलांना अन्नदान,खाऊ वाटप,शालेय साहित्य वाटप,इ कार्यक्रम राबविले जातात अश्या उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य असेल असे सौ खर्डेकर म्हणाल्या. यावेळी शर्मिला निमकर यांनी दिवाळी सणाची माहिती दिली तर मीनल मनमाडकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले.बचत गटाच्या प्रमुख शोभाताई सरोदे यांनी आभार व्यक्त केले.या वेळी सौ रुक्मिणी कांबळे,सौ कुंदा राऊत यांच्यासह २५ भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला.