पुणे-उद्यम विकास सहकारी बँकेने सुनियोजित आणि यथोचित कार्य करताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली असे मत येथे आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले .
उद्यम विकास सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते बँकेच्या सभासदांच्या व खातेदारांच्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,यात दहावीत ९८.२०% गुण मिळवणारा कनक खिंवसरा,९८% मिळवणारी तन्वी तारकुंडे,९२% गुण मिळवणारी तनया देव,अमित गाटे यांचा तर ९१ % मिळवणाऱ्या अक्षदा डोईफोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बारावी च्या परीक्षेत ८६% गुण मिळवणारा मानस गोडबोले,८१% गुण मिळवणारा निरंजन केसकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेच्या प्रगतीची कौतुक करताना नोटबंदीच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केलेले कष्ट आपण अनुभवले असून त्या काळात ग्राहकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार केल्यामुळेच बँकेस प्रगती साधता आली असे ही त्या म्हणाल्या,तसेच जसे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे तसेच बँकेच्या संचालकांचा ही या प्रगतीत मोलाचा वाट असल्याचे ही त्या म्हणाल्या.आपल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्याबद्दल ही बँक अभिनंदनास पात्र आहे.
उद्यम विकास सहकारी बँकेने ५% लाभांश जाहीर केला असून बँकेस एन पी ए ची टक्केवारी ही कमी करण्यात यश मिळाले असून बँकेची सर्वांगीण प्रगती होत असल्याचे बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.,बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सर्व सभासदांचे स्वागत करताना ” बँकेने १०० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात बँकेस व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली असून बँकेचा कार्यविस्तार करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.”असे सांगतानाच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नोटबंदी च्या काळात उत्तम कामगिरी केल्याची ही ते म्हणाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मेधा कुलकर्णी,बँकेच्या उपाध्यक्ष लीनाताई अनास्कर,संचालक पांडुरंग कुलकर्णी,दिलीप उंबरकर,महेंद्र काळे,मनोज नायर,दिनेश गांधी,शिरीष कुलकर्णी,गोकुळ शेलार इ उपस्थित होते.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक देशपांडे यांनी अहवाल वाचन केल्यावर सर्व सभासदांनी एकमताने बँकेच्या ठरावांना मान्यता दिली.
दीपक देशपांडे यांनी सूत्र संचालन केले तर उपाध्यक्ष सौ लीना अनास्कर यांनी आभार प्रदर्शन केले.