कोथरूड नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…. नाट्यमहोत्सवासह विविध समाजोपयोगी उपक्रम
पुणे-कोथरूड नवरात्र महोत्सवाचे हे बारावे वर्ष असून दर्जेदार कार्यक्रमांमुळे हा महोत्सव कोथरुडकरांच्या पसंतीस उतरला आहे असे या महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विशाल भेलके,मंदार बलकवडे आणि उमेश भेलके यांनी सांगितले.क्रिएटीव्ह फाउंडेशन आयोजित या नवरात्र महोत्सवास गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी भेलकेवाडी आझादनगर येथे घटस्थापनेने सुरुवात होणार असून दिनांक २३ सप्टेंबर पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाट्यमहोत्सव रंगणार आहे,यात २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता “आई रिटायर होतीये ” रविवार 24 सप्टेंबर दुपारी 12 वाजता फक्त महिलांसाठी लावणीचा बहारदार कार्यक्रम ” तुमच्यासाठी काय पण ” होणार आहे.सोमवार २५ सप्टेंबर रोजी रात्रौ ९ वाजता जितेंद्र भुरूक यांचा गीतो का सफर हा ऑर्केस्ट्रा,२६ सप्टेंबर रोजी रात्रौ ९ वाजता संदीप पाठक यांचे वऱ्हाड निघालाय लंडनला तर बुधवारी रात्रौ ९ वाजता पती सगळे उचापती हे नाटक सादर केले जाणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले,हे सर्व कार्यक्रम मोफत असल्याचे ही ते म्हणाले.
या महोत्सवांतर्गत भोर येथी वाघजाईमाता सांस्कृतिक हॉल ला २०० ताटे व ४०० वाट्या भेट देण्यात येणार असल्याचे विशाल भेलके म्हणाले. शुक्रवार २९ सप्टेंबर व शनिवार ३० सप्टेंबर रोजी दांडियाचा कार्यक्रम रंगणार असून विविध वस्त्यांमध्ये भोंडल्याची कार्यक्रम आयोजित केले आहेत असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले,तसेच या कार्यक्रमांदरम्यान स्वदेशी वापराकडे नागरिकांचा कल वाढावा यासाठी प्रचार करणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.नागरिकांनी मोफत पासेस साठी संयोजक विशाल भेलके ९९६००२३०२३,मंदार बलकवडे ९७३०९४९४९४ व उमेश भेलके ९८२३२३८१८१ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.