पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ
सेवा उपलब्ध केल्यास नागरिकांचा कचरा वर्गीकरणास सकारात्मक प्रतिसाद – आमदार मेधा कुलकर्णी.
सेवा व स्वच्छता फक्त “एक दिवस सेवा वा एक दिवस स्वच्छता” असे नसुन त्यात सातत्य राखण्याची आवश्यकता- नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेस प्रारंभ….
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.या उपक्रमात ज्या घरात जैव वैद्यकीय कचरा उत्पन्न होतो अश्या घरोघरी वेगळ्या प्रकारचे डबे भेट देण्याचा व त्यात वैद्यकीय कचरा साठवून तो स्वतंत्रपणे संकलित करण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ आ मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.पुणे मनपा कमींस इंडिया आणि क्रीएटिव्ह फौंडेशन च्या सहकार्याने हा उपक्रम कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.तसेच मा मोदींचा सेवा व स्वच्छता हा संदेश एक दिवसासाठीचा उपक्रम नसुन नागरिकांनी कायमस्वरूपी आपला परीसर कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे किंबहुना याची जाणीव ठेवणे हे प्रत्येक जागरूक नागरीकांचे कर्तव्य आहे असे ही त्या म्हणाल्या.त्यासाठीच आपण जैव वैद्यकीय कचरा,ई कचरा,प्लॉस्टिक कचरा संकलनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवादिन म्हणुन साजरा करताना “आपण रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे असे नागरिकांना सांगतो पण तशी सेवा उपलब्ध करुन देत नाही.ती सोय उपलब्ध करुन दिली तर नागरिक कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण करतील असे मत आ मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आपण जैव वैद्यकीय कचरा रोजच्या कचऱ्यात टाकतो तेव्हा ते गोळा करणाऱ्या स्वच्छता सेवकांना काय वाटत असेल याचा संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे असुन,असा उपक्रम सर्वप्रथम माझ्या मतदारसंघात नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सुरु केला हे कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी सर्व संबंधित संस्थांचे अभिनंदन केले
यासंदर्भात प्रभागात सर्वे केला असुन आत्तापर्यंत २०० कुटुंबानी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असुन त्यांनी दरमहा साठवलेला जैव वैद्यकीय कचरा कैलास स्मशानभूमीतील पास्को एनव्हायरोन्मेंट कंपनी मार्फत या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांनी सांगितले.
यावेळी हॅपी कॉलोनीतील ऋतिका टेरेसेस पासून या वेगळ्या प्रकारच्या पिवळ्या,पांढऱ्या व लाल रंगाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मा मिलिंद फडके,अविनाश देशपांडे,श्रीमती सुधा मराठे यांनी या जागरूक नागरिकांनी या मोहिमेत भाग घेण्यास सहमती दर्शविली.यांना आ मेधा कुलकर्णी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते जैव वैद्यकीय कचरा संकलनासाठीचे डबे भेट देण्यात आले.ही मोहिम अत्यंत उपयुक्त असुन यात अधिकाधिक नागरिकानी सहभागी व्हावे असे आवाहन मिलिंद फडके यांनी केले व याद्वारे जैव वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण घरातच करता येइल असे ही ते म्हणाले.
Segregation at Source महत्त्वाचे (स्रोतापाशी विलगीकरण ) असुन सर्व प्रकारच्या कचऱ्याचे निर्मितीच्या स्रोतापाशीच विलगीकरणासाठी क्रीएटिव्ह फौंडेशन प्रयत्नशील आहे असे संस्थेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी या उपक्रमाच्या संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, आरोग्य निरीक्षक किरण गुरव,राहुल शेळके,कमींस इंडिया चे संपत खैरे,भाजप चे गणेश चव्हाण,विशाल शिंदे,अजय भोइटे,अमीर वाघमारे,आदित्य राउत इ उपस्थित होते.