प्रत्येकाने घरातच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ही काळाची गरज – असे उपक्रम सर्व प्रभागात राबविणे गरजेचे -महापौर मुक्ता टिळक.
पुणे- येथील प्रभाग १३ च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जैववैद्यकीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लॉस्टिक कचरा ही प्रभागातच जिरविण्याच्या दृष्टीने जे उपक्रम सुरु केले ते स्तुत्य असून शहरातील सर्वच प्रभागात असे उपक्रम राबविले पाहिजे.कचऱ्याचे वर्गीकरण आणि विघटन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून Segregation at Source म्हणजे जेथे कचरा निर्माण होतो तेथेच त्याचे वर्गीकरण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
प्रभाग १३ च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी श्री रिसायकलर्स च्या मदतीने प्रभागातील ई कचरा तर मे क्लीन गारबेज मॅनेजमेन्ट या संस्थेच्या सहकार्याने प्लॉस्टिक कचरा संकलन व जनजागृती मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.कोथरूड च्या आमदार मेधा कुलकर्णी,प्रभाग समिती चे अध्यक्ष सुशील मेंगडे,नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे,दीपक पोटे,जयंत भावे,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,या उपक्रमाला सहाय्य केलेले वनराई चे रवींद्र धारिया,क्रीएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,हॅपी कॉलनी फेडरेशन चे अध्यक्ष राघवेंद्र पुरोहित,कार्याध्यक्ष सुरेश मालशे,सचिव विनीत गोखले इ मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मा महापौरांचे हस्ते स्वच्छ च्या कचरावेचक सेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांचा ही या सर्व उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग आणि सन्योजनाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.त्याचा उल्लेख करुन महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की ” या सेवकांकडे मानवीय दृष्टीकोणातून बघितले पाहिजे,त्यांची कचरा गोळा करतानाची किंवा वर्गीकरण करतानाची अवस्था आपण बघितली तर ओला व सुका कचरा वेगळा करुन देणे तसेच प्रत्येक भागातील कचरा त्याच भागात जिरविण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे”
आमदार मेधा कुलकर्णी यांनी ” कचऱ्याची समस्या गंभीर असुन जर परदेशात कचऱ्याची विल्हेवाट लागू शकते व तेथील नागरिक त्यांचा कचरा वर्गीकरण करुन देउ शकतात तर आपण का नाही असा सवाल उपस्थित करुन पुणेकर नजीकच्या काळात हे करुन दाखवतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच प्लॉस्टिक कचऱ्याची समस्या मोठी असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे नमूद करुन सूस रोड येथील कचरा विघटन प्रकल्पाचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या की हा प्रकल्प आधीच्या सत्ताधाऱ्यांनी उभारला पण तो उभारताना तेथील नागरिकांना येणाऱ्या समस्यांचा विचार न करता उभारला ,आता तेथे घाण वास आणि रोगराई चा प्रसार होत असुन प्रकल्प उभारताना त्याचा नागरिकांच्या अनुषंगाने विचार होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या संयोजक मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की ” माझा प्रभाग हा झीरो गारबेज प्रभाग करण्याकडे मी प्रयत्नशील असुन जैववैद्य्कीय कचऱ्यापाठोपाठ ई कचरा व प्लॉस्टिक कचरा संकलन मोहिमेद्वारे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.ही मोहिम एक दिवसाची नसून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून ई कचरा देणाऱ्या सोसाय्ट्याना श्री रिसायकलर्स चे विनीत बियाणी हे त्या वजनाइतक्या वजनाचे पर्यावरणपूरक एल ई डी बल्ब आणि ट्युबलाईट देणार आहेत,तर मे क्लीन गारबेज मॅनेजमेन्ट चे ललित राठी हमी भावाने प्लॉस्टिक कचरा विकत घेणार असून यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे वर्गीकरण करुन ते देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अस्रे आमच्या सर्वे मधे दिसून आले आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक व आमदार मेधा कुलकर्णी यांना पर्यावरणपूरक बल्ब,कचरयापासून बनविलेल्या कुंड्या,आयुर्वेदीक रोप व पुस्तके देउन श्री रिसायकलर्स चे श्री विनित बियाणी व सुरेश लखोटिया यांनी सन्मानित केले.
पाहुण्यांचे सत्कार विनोद चव्हाण,रमेश चव्हाण,गणेश चव्हाण,सौरभ अथनीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन तर गणेश सोनुने यांनी आभार प्रदर्शन केले.हॅपी कॉलनी परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संखयेनी उपस्थित होते.