प्रभाग १३ मधील प्रत्येक घरातील जैव वैद्यकीय कचरा संकलन उपक्रमाचे उदघाटन…
पुणे-नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटीव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रभाग १३ मधील कचरा प्रभागातच जिरविण्याची आराखडा तयार केला हे कौतुकास्पद असून अश्याच पद्धतीने प्रत्येक भागात छोट्या प्रकल्पांच्या उभारणीतून शहरातील कचरा समस्या सुटण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
खर्डेकर दांपत्य केवळ आराखडा तयार करून थांबले नाहीत तर त्यांनी सी एस आर ( कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ) अंतर्गत निधी मिळवून आज जैव वैद्यकीय कचरा संकलनाच्या उपक्रमाचे उदघाटन केले हे महत्वाचे असून शहराच्या विविध भागात असे छोटे प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात येईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून आता नवीन प्रकल्प उभारणीसाठी जागा ताब्यात आल्या आहेत,तेथे योग्य प्रकल्प उभारून शहरातील कचऱ्याचे विघटन केले जाईल पण त्याच बरोबर छोटे प्रकल्प उभारण्यासाठी मी निधीची कमतरता भासू देणार नाही आणि सर्वतोपरी मदत करू असे ही ते म्हणाले.
ग्लोबल ग्रुप,कमिन्स इंडिया,आणि क्रिएटीव्ह फाउंडेशनच्या वतीने प्रभाग १३ मधील प्रत्येक घरातील जैव वैद्यकीय कचरा संकलनाच्या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,कमिन्स इंडिया च्या उमा अय्यर,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,नगरसेविका वृषाली चौधरी,माधुरी सहस्रबुद्धे,उपायुक्त सुनील केसरी,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,तसेच भाजपचे पदाधिकारी प्रशांत हरसूले ,कुलदीप सावळेकर,गौरी करंजकर,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे, स्वाती हिर्लेकर,सुवर्णाताई काकडे,संगीताताई शेवडे,माणिक दीक्षित,प्राची बघते,शुभांगीताई सुदामे,प्रमिलाताई फाले,संगीताताई आडवडे इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी या भागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली तसेच प्रभागाचा सर्वे करून येथे साधारण ३५ ते ४० टन कचरा प्रतिदिनी गोळा होतो त्याची विल्हेवाट प्रभागातच लावण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.प्रभागातील जैव वैद्यकीय कचरा ( इंजेक्शनच्या सुया व सिरिंज ,सलाईन किट,मुदतबाह्य औषधें,बँडेज,कापूस,ग्लोव्ज,युरी न बॅग ) यांचे प्रत्येक घरातून संकलन करून हा कचरा पास्को एन्व्हायरॉन्मेंटल सोल्युशन्स च्या कैलास स्मशानभूमी येथील प्रकल्पात विल्हेवाटीसाठी पाठविण्यात येणार आहे,असे ही त्यांनी स्पष्ट केले. ” जैव वैद्यकीय कचरा,इ वेस्ट,झावळ्यांचा कचरा,प्लास्टिक व थर्मोकोलचा कचरा आणि नेहमीच ओला व सुका कचरा असा सर्व कचरा आमचा आम्ही विल्हेवाट लावू शकतो असे नियोजन केले आहे.छोट्या छोट्या प्रकल्पातून कोणालाही त्रास न होता आम्ही प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यात एक वर्षात यशस्वी होऊ असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या,यासाठी फक्त जागा उपलब्ध करून द्यावी ,अनेक कार्पोरेट कंपन्या सी एस आर मधून निधी उपलब्ध करून देण्यास तयार असून याचा कल्पकतेने वापर केल्यास अनेक चांगले प्रकल्प उभारता येतील असे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.
” मी ज्याप्रमाणे रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला,तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मोठ्या सोसायट्यांमध्ये छोटे प्रकल्प उभारण्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी सूचना आ मेधा कुलकर्णी यांनी केली.त्यांनी नितीनजी गडकरींचा संदर्भ देऊन सांगितले कि आपला कचरा आपणच जिरवणे ही सुद्धा देशभक्तीचं आहे.त्यासाठी आता नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.तसेच कचरा विघटन प्रकल्पातून जर घाण वास आला नाही,यावर काही उपाययोजना करता आली तर अधिक चांगल्या पद्धतीने नागरिक असे प्रकल्प उभारण्यास पुढे येतील असे ही त्या म्हणाल्या.
या जैव वैद्यकीय कचरा संकलन मोहिमेसाठी टेंपो देणारे ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी,संकलनासाठी घरोघरी वेगळे कचऱ्याचे डबे देणाऱ्या व सर्वे करणाऱ्या कमिन्स इंडिया च्या उमा अय्यर,या प्रकल्पाचे नियोजन करणारे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,पास्को एन्व्हारॉन्मेंटल सोल्युशन्स चे सुनील दंडवते यांचा ना गिरीशभाऊ बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले,संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले ,गौरी करंजकर,बाळासाहेब धनवे राजेंद्र येडे यांनी स्वागत केले व गणेश सोनुने यांनी आभार मानले,