पुणे :प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी आज गौरी गणपती साहित्य जत्रेला सदिच्छा भेट दिली. संध्याताई चे महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. संध्याताई यांनी काँग्रेस भवन येथे आयोजित गौरी गणपती साहित्य जत्रेच्या प्रत्येक स्टॉल ला भेट दिली. महिलांनी तयार केलेले कलात्मक वस्तूंचे महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी भरभरून कौतुक केले, व त्यांनी या स्टॉल्स वरून अनेक लागणाऱ्या वस्तू खरेदी सुद्धा केल्या
पायल तिवारी बिटीया फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत तिवारी यांनी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांचा साडी, तुळशीचे रोप, गाईवासरूचे शिल्प ( मूर्ती ) देऊन सत्कार केला.
या प्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या पधादिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पूजा आनंद, अरफिक शेख, सुवर्णा माने, पुनीत तिवारी, अंजली सोलापुरे, स्वाती शिंदे, सीमा सावंत, इंदिरा अहिरे व अनेक महिला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
गौरी गणपती साहित्य जत्रेतील अनेक स्टॉल वर भेट देत संध्याताईंनी महिलांनी केलेल्या कारीगिरी व कौशल्याची प्रशंसा केली.
गौरी गणपतीनिमित्त सर्व संबंधित वस्तूंची खरेदी “वाती ते मूर्ती” सर्व एकाच छताखाली करता यावी, त्यात दर्जेदारपणा व माफक किंमत असावी आणि महिलांना रोजगार मिळावा या हेतूने या साहित्य जत्रेचे गेले १५ वर्षांपासून आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे १३वे वर्ष आहे. यामध्ये सुमारे ७० ते ८० स्टॉल असणार असून महिला बचत गटांच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत असलेल्या बचत गटांना समाविष्ट केले जात असते. या साहित्य जत्रेमध्ये गौरी गणपती मूर्ती, आरतीचे साहित्य, गौरीचे दागिने, मखर व अन्य आरास यासाठी आवश्यक साहित्य त्याचबरोबर मोदक, फराळ व प्रसादाचे पदार्थ, साहित्य व वस्तू आदी रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते दि. ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवनचे पटांगण येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
पायल तिवारी बिटीया फाऊंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत तिवारी यांनी या जत्रेचे आयोजन केले आहे.