पुणे-मी तीन वेळा ह्या प्रभागाची नगरसेविका म्हणून निवडून आले व या भागाचे मनपा मधे प्रतिनिधीत्व केले,तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो आणि अनेक कामे करताना अडचणी यायच्या,मात्र आता आम्ही सत्तेत आहोत आणि त्यामुळे कामे करणे अधिक सोपे झाले आहे असे सांगतानाच विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व नगरसेवक जयंत भावे यांच्या विकासनिधीतून प्रभाग १३ मधील मोरेश्वर सभागृह रस्ता व परिसरातील गल्ल्यांच्या डांबरीकरणाच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.आता आमदार म्हणून काम करताना अधिक विकासकामे करता येतात व शहरातील आणि विशेषतः कोथरूड मधील नागरी समस्या समजून घेउन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असते असेही त्यांनी सांगितले.यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल अभय शास्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आम्ही सर्व नगरसेवक एकत्र बसून प्रभागातील समस्यांवर चर्चा करतो आणि मग नागरिकांनी सुचविलेल्या व लोकोपयोगी कामांसाठी निधीचा विनियोग करतो असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या,तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरातील आवश्यक कामांची माहिती वेळेत दिली तर त्याचा समावेश बजेट मधे करता येतो व त्याद्वारे नियोजनबद्ध विकास शक्य होतो असे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील नागरिकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विकास कामांची आखणी करतो,नागरिकांनी ही लोकप्रतिनिधींशी संपर्कात राहिल्यास प्रभागाचा विकास अधिक सुकर होइल असे सांगतानाच ” आम्ही नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध आहोत असे नगरसेवक जयंत भावे म्हणाले.
यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर,प्रशांत हरसुले,सुधीरजी नाईक,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,संगीताताई आदवडे,संगीता शेवडे,नीलेश घोडके,सुवर्णाताई काकडे,सुलभाताई जगताप,जयेश सरनौबत,चंद्रकांत पवार,हेमंत भावे,प्रफुल्ल सुभेदार,अमोल डांगे,जगदीश डिंगरे,सुनील भोसले,विठ्ठल मानकर,नारायण वायदंडे,नचिकेत कुलकर्णी इ उपस्थित होते.
यावेळी लायन्सचे उपप्रांतपाल अभय शास्त्री व परिसरातील नागरिक नित्यानंद मेहेंदळे,श्रीकृष्ण इंडस्ट्रीजचे श्री गणेशवाडे,कीट्रोनिक्स चे श्री कुलकर्णी,श्री गद्रे,श्री काळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले तर राज तांबोळी यांनी सूत्रसंचालन व राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.

