‘डान्स मूव्हमेंट थेरपी‘मध्ये शारीरिक हालचालींचा
अद्वितीय सायकोथेराप्युटिक वापर करून भावनिक, संज्ञानात्मक,
शारीरिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी प्रचार.
पुणे, हेल्थकेअर आजच्या काळातील जगातील सर्वात क्लिष्ट, गतिमान आणि जलदगतीने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. पर्यायी थेरपीच्या प्रकारात भर घालत संचेती हॉस्पिटलने डॉ. निकिता मित्तल यांच्या संयुक्त विद्यमाने डान्स मूव्हमेंट थेरपी हा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम न्यु यॉर्क स्थित कायनेक्शनशी संलग्न आहे.
‘डान्स मूव्हमेंट थेरपी’मध्ये भावनिक, संज्ञानात्मक, शारीरिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी शारीरिक हालचालींचा सायकोथेराप्युटिक वापर केला जातो. ‘डीएमटी’ ही मानसिक आरोग्याकडे एक समग्र दृष्टिकोणाने पाहणारी थेरपी आहे जी शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाचे तांत्रिक ज्ञान वापरते. जागतिक संशोधनाद्वारे समर्थित कलेक्टिव्ह डान्स मूव्हमेंट थेरपी शरीर, मन, आणि आत्मा एकीकरणासाठी मदत करते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात संचेती हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गुणवत्तापूर्ण आर्थोपेडिक केअर, शिक्षण आणि संशोधनासाठी हे हॉस्पिटल एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अस्तित्वात आहे. आता डान्स थेरपीचे फ्यूजन सादर करत असून हा प्रोग्राम फिजिओथेरेपीच्या क्षेत्रात एक उत्तम वरदान असेल. हा कार्यक्रम यु. एस, यु. के आणि जर्मनीमध्ये लोकप्रिय आहे आणि आता संचेती हॉस्पिटलद्वारे तो भारतात पहिल्यांदाच सादर केला जात आहे.
संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा सांघवी म्हणाल्या की, “सध्या भारतातील विज्ञान व पारंपरिक विज्ञान, संबंधित संसाधने आणि उपचारांमध्ये मोठ्या बदलांसाठी हा एक उत्कृष्ट काळ आहे. हा गतिमान बदल संचेतीच्या विद्यार्थ्यांना जगभरातील व्यावसायिक अभ्यासाच्या संधी उपलब्ध करून देईल. संशोधनावर आधारित या अभ्यासाला प्रत्येक कार्यक्षेत्रात महत्त्व आहे”.
लाईफ अँड डान्स या डान्स/मूव्हमेंट थेरपी अकॅडमीच्या डॉ. निकिता मित्तल म्हणाल्या की, “डान्स थेरपी आरोग्य विज्ञाना सह कलेच्या उपचारात्मक मूल्यांचे एकत्रीकरण करते. कला आणि सर्जनशीलता व वैद्यकिय शास्त्रांचा सर्वोत्तम मेळ असलेला हा कार्यक्रम आहे. ह्या अभ्यासक्रमाविषयी आम्ही संचेतीला माहिती कळविताच मनिषा संघवी यांनी आमचे ध्येय समजून घेऊन आम्हाला त्वरित साथ दिली”.
शारीरिक आणि मानसिक रुग्णांवर उपचाराकरिता हेल्थकेअर प्रोफेशनल्सना हे एक नविन साधन असेल.
या थेरपीचे वैशिष्ट्य हे आहे कि सर्व वयोगटातील लोकांसाठी ही फायद्याची आहे. लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह डान्स, शारीरिक जखम, मनोरुग्णांचे पुनर्वसन व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी ही थेरपी परिणामकारक आहे.
डॉ. निकिता मित्तल त्यांच्या ध्येयाविषयी बोलताना म्हणाल्या की, “या कोर्सला भारतात आणून थेरपीस्ट्सना हे डान्स सायन्स एजुकेशन रास्त दारात उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. संचेती हेल्थकेअर अकॅडमी सारख्या आशियातील प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सोबत संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवणे यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही”.