Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

१५ ऑगस्ट पासून १ लाख ४५ हजाराची वाशिंग मशीन बाजारात …

Date:

पुणे – सॅमसंग इंडियाने आज वॉशर व ड्रायरची सोय असलेली फ्लेक्सवॉश ही क्रांतीकारी यंत्रणा लाँच केली. उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या या उपकरणामध्ये दोन वॉशर्स आणि एक ड्रायरचा समावेश करण्यात आला आहे. या उपकरणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपयुक्तता व कलात्मक रचना यांचा मेळ घालण्यात आला आहे.

सॅमसंगच्या मूलभूत लाँड्री तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या फ्लेक्सवॉश उपकरणात लोकप्रिय अॅडडोअर वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकाला लाँड्रीसाठी ते वापरताना पूर्ण स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळतेच, शिवाय कपडे दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यांची आवश्यक काळजीही घेतली जाते.

सतत व्यग्र असलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत कपडे धुता यावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या या वॉशिंग मशिनमध्ये २३ किलोपर्यंतचे वजन स्वीकारण्याची क्षमता आहे. हे बहुपयोगी मशिन सॅमसंगच्या तीन मूलभूत तंत्रज्ञानांचा वापर करते. त्यात इकोबबल, बबल सोक आणि व्हायब्रेशन रिडक्शन टेक्नॉलॉजी (व्हीआरटी प्लस) यांचा समावेश आहे. इकोबबल पाणी व हवेचा वापर करून वॉशिंग पावडर विरघळवते आणि स्वच्छतेचे काम अधिक जलद व परिणामकारक होण्यासाठी बबल अॅक्शन तयार करते.

युनिट्स आयओटीवर आधारित आणि स्मार्ट कंट्रोलचा समावेश असलेले आहेत, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे मशिनवर कुठूनही आणि कोणत्याही वेळेस लक्ष ठेवता येते. मशिन कोणत्याही वेळेस सुरू किंवा बंद करण्याचं नियंत्रण अक्षरशः त्यांच्या तळहातात असतं. कलात्मक रचना आणि सोयीस्कर डिझाइनमुळे भारतीय ग्राहकाच्या वेळेची आणखी बचत होते. आयओटीवर आधारित उपकरणे भविष्यात जास्त प्रचलित होणार असून या तंत्रज्ञानाचे प्रवर्तक असलेली सॅमसंग आपल्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये त्याचा वापर करण्याच्या तयारीत आहे.

‘ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॅमसंगने कायमच नाविन्यपूर्णतेत आघाडी राखत नवनवीन उत्पादने तयार केली आहेत. फ्लेक्सीवॉशच्या लाँचसह कपडे धुण्याचे काम जास्त सोपे आणि सोयीस्कर करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या नाविन्यपूर्णतेतील प्रत्येक वैशिष्ट्य हे ग्राहकाला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आले आहे,’ असे अलोक पाठक, उपाध्यक्ष, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले. ‘ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल पाहायला मिळत असून ड्युएलवॉलश आणि अडवॉशसारख्या तंत्रज्ञानांना त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या क्षेत्रातील आघाडीचे स्थान मजबूत करण्यास आम्हाला मदत होत आहे,’ असेही ते म्हणाले.

किंमत आणि उपलब्धता

फ्लेक्सवॉश १५ ऑगस्ट २०१७ पासून सॅमसंगच्या सर्व दालनांत आणि प्रमुख रिटेलर्सकडे १,४५,००० रुपयांत उपलब्ध होणार आहे.

 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि. आपल्या परिवर्तन घडवू शकणाऱ्या संकल्पना आणि तंत्रज्ञानांच्या मदतीने जगाला प्रेरणा देते व त्याचे रूपही बदलते. कंपनी टीव्ही, स्मार्टफोन्स, वेअरेबल उपकरणे, टॅब्लेट्स, डिजिटल उपकरणे, नेटवर्क यंत्रणा आणि मेमरी, सिस्टीम एलएसआय व  एलईडी सोल्यूशन्स या क्षेत्रांतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...